चुनाभट्टी - ओएनजीसी मधील एमओयु कंत्राटी कामगारांनी आर एल सी, सीजीआयटी, हायकोर्ट व शेवटी सुप्रीम कोर्ट या ठिकाणी आपला लढा यशस्वीपणे दिल्यामुळे आज त्यांच्या पगारात दहा हजार रुपयांची वाढ होऊन त्यांच्या धनतेरस ख-या अर्थाने धन प्राप्त झाले.
महाराष्ट्र संघटित असंघटित कामगार सभा चे जनरल सेक्रेटरी, जेष्ठ नेते काॅ. सूर्यकांत बागल व त्यांच्या बरोबर एकजूट उभारून लढणारे महाराष्ट्र एम्प्लाॅईज युनियन चे नेते एडव्होकेट श्री. एफ.आर मिश्रा यांच्या नेतृत्वाखाली हा लढा यशस्वी झाला, म्हणून यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कामगारांनी आज आर.एल.सी.(केंद्रीय ) यांच्या चुनाभट्टी येथील कार्यालयात एका छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.