मालेगाव - पुरोगामी विचारसरणीचा प्रसार व प्रचार करणाऱ्या महाराष्ट्र पुरोगामी पत्रकार संघाचा स्नेह भेट मेळावा येत्या २२ नोव्हेंबर २०२० रोजी आयोजित केला आहे. सदर राज्यस्तरीय स्नेह भेट मेळावा मालेगाव येथे घेण्यात येणार आहे. या मेळाव्याच्या आयोजनाची जबाबदारी संघाचे राज्य उपाध्यक्ष प्रकाश चितळकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी स्वीकारली आहे. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती सिनेअभिनेत्री सुनीता तोमर यांची असणार आहे.
पुरोगामी पत्रकार संघातील सर्व सन्माननीय सदस्यांना विनंती आहे की महाराष्ट्रातील तमाम पत्रकारांनी या बैठकीला मोठया संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. सदर मेळाव्याचे ठिकाण लवकरच कळविण्यात येईल.
या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी आपली नावनोंदणी राज्य उपाध्यक्ष श्री प्रकाश चिताळकर
यांच्याकडे करावी.