महाराष्ट्र पुरोगामी पत्रकार संघाचा राज्यस्तरीय स्नेह मेळावा

प्रदेशाध्यक्ष विनोद पवार यांनी केले उपस्थित राहण्याचे आवाहन


नाशिक- महाराष्ट्र राज्य पुरोगामी पत्रकारासंघाचा राज्यस्तरीय स्नेहमेळावा ,संम्मेलन व आढावा बैठकीचे आयोजन २२ नोव्हेंबर २०२०रोजी करण्यात आले आहे. या बैठकीस कृषी व सहकार मंत्री माननीय दादासाहेब भुसे व ख्यातनाम अभिनेत्री सुनिता तोमर , पुरोगामी पत्रकार संघाचे सन्माननीय संस्थापक अध्यक्ष विजयजी सुर्यवंशी सर्व मान्यवर सदस्य , पदाधिकारी , निमंत्रीत मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या भव्य सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य पुरोगामी पत्रकारासंघाचे प्रदेशाध्यक्ष विनोद पवार यांनी केले आहे.


याप्रसंगी पुरोगामीची ध्येय धोरणे ,उद्देश, घटना , सामाजीक जबाबदारी , सर्वसमावेशक घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी सकारात्मक उपक्रम, याबरोबर सामाजीक , सांस्कृतिक , शैक्षणिक , कृषी, उद्योग याच्या माध्यमातुन स्वयंप्रेरणेने , स्वयंस्फुर्तीने , योगदान देण्यासाठी ची भुमिका , तळमळ , ही संघाची शिदोरी आहे. जबाबदार पदावर जबाबदार व्यक्ती  यानुसार पदनियुक्ती करताना , निवड करतानाचे निकष हे कसोटी घेणारे आसाले तरी दिर्घकालीन यशस्वीपणे  कार्यरत राहण्यासाठीचा तो एक भक्कम पाया आहे व पाया भक्कम  असला तर उद्दिष्ट पुर्तीसाठी संकल्पना सकारात्मक असाव्या लागतात व त्याचे आव्हान पेलण्यासाठी विशाल दृष्टीकोनअसावा लागतो व तो या पुरोगामी कडे आहे हे मान्य करण्यासाठी  कींवा कोणाच्या प्रमाणपत्राची आवश्यकता भासावी असे विचार संघाच्या विकासात्मक ध्येय धोरणाशी निश्चितच निगडीत नाही .संघ व संस्था यांना परिवाराचे स्वरुप आले की मानसन्मान , प्रतिष्ठा,या बाबी दुय्यम ठरतात कोणाशीही,कोणत्याही प्रकारची स्पर्धा न करता  समाजउपयोगी हितांच्या विचाराला  अग्रक्रम  देत प्रामाणिकपणे  त्या विचारांची जपवणुक करण्यासाठी  वेळ देणे आर्थिक  तरतुद करणे या बाबी सहजसाध्य करण्यासाठी उपक्रमशील व्यक्तींचा समावेश या संघात असल्याने   हा एक सुवर्णाच्या  झळाळीच्या तेजाशी समरसअसल्याचा भाव प्रगट होतो व अशा वैशिष्ट्ये  , विचार , सहेतुक दृष्टीकोन अशा भुमीकांच्या संगमासाठी आयोजीत स्नेह मेळाव्यास आपल्या सर्वांची उपस्थिती  ही उज्वल भवितव्यासाठी दिशासुचक असणारआहे यात शंकाच नाही.


  सन्माननिय सुर्यवंशी साहेब , स्नेहमेळाव्याची जबाबदारी पुर्तीसाठी कार्यरत माननीय प्रकाशजी चितळकर व  टिम माननीय प्रविणजी परमार यांचे मार्गदर्शन मोलाचे आहे.