जळगाव - विवेकानंद प्रतिष्ठान संचालित काशिनाथ पलोड पब्लिक स्कूलमध्ये दसरा हा सण ऑनलाइन पद्धतीने साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी शाळेचे प्राचार्य अमित सिंह भाटिया , समन्वयिका संगीता तळेले ,स्वाती अहिरराव ,अनघा सागडे हे उपस्थित होते.
सदर कार्यक्रमासाठी इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी आपली उपस्थिती ऑनलाइन पद्धतीने दर्शवली कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन आणि शस्त्रपूजन यांच्यासोबतच कोविड योद्धे यांचे पूजन करून करण्यात आली. संगीत शिक्षिका स्वाती देशमुख यांनी गीत सादर केले .वेणू मुंदरा, शुभम जयस्वाल , ऋतूच खाडिलकर या विद्यार्थ्यांनी विजयादशमी या दिवसाचे महत्त्व सांगितले तर श्रावणी अर्णीकर हिने नृत्य सादर केले व अवनी दर्यापूरकर हिने कविता सादर केली .
पीपीटी प्रेझेंटेशन द्वारा कोविड योद्ध्यांचे महत्त्व व कार्य व करोना विषयी घेण्याची काळजी हे प्रस्तूत केले शाळेचे प्राचार्य अमित सिंह भाटिया समन्वयिका संगीता तळलेले स्वाती अहिरराव अनघा सागडे व सांस्कृतिक विभाग प्रमुख भारती अत्तरदे यांच्या हस्ते रावण दहनाचा कार्यक्रम करण्यात आला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धीरज जावळे समृद्धी कुरमभट्टी व प्रणिता भोर टक्के यांनी केले तर आभार प्रदर्शन दीक्षा चांदेसरे हिने केले .कार्यक्रमाचे तांत्रिक नियोजन तांत्रिक नियोजन निलेश बडगुजर ,अनिरुद्ध डावरे समाधान पाटील ,प्रदीप पाटील यांनी केले व या कार्यक्रमासाठी शाळेचे शिक्षक मिनू छाजेड, नम्रता कुलकर्णी रवींद्र भोईटे ,संतोष शिरसाळे गणेश देसले, स्वानंद देशमुख, अनिल कोथळकर ,अरुण पाटील कांचन सरोदे ऋषाली धर्माधिकारी यांनी परिश्रम घेतले व शाळेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सर्व उपस्थित होते