जळगाव - खानदेश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या अमृत महोत्सव निमीत्त ए.टि.झांबरे माध्यमीक विद्यालयात दि 8 रोजी ऑनलाईन पेपर प्रेझेंटेशन स्पर्धा आयोजित करण्यात आली.विषय "कोविड 19 चा पर्यावरणावर झालेला परिणाम" .इयत्ता 9वी 10वी च्या विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर असे सादरीकरण केले.
अक्षदा धनंजय चौधरी,पायल गजानन थोरात,दिशा नितीन चौधरी,टीना पाचपोळ या विद्यार्थिनिनी अतिशय उत्तम सादरीकरण केले. कोविड१९मुळे पर्यावरणावर सकारात्मक बदल घडून आला आहे.विद्यार्थिनींनी विविध प्रकारच्या स्लाईडस तयार करून सादरीकरण केले .कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक डी.व्ही.चौधरी, पर्यवेक्षिका प्रणिता झांबरे, शिक्षक वृन्द एन.बी.पालवे, .एम.एस.नेमाडे, डी.ए.पाटील, इ.पी.पाचपांडे ,मनिषा ठोसरे, पी.आर.राणे,विवेक मोरे ,व्ही आर .राणे आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोहिणी पाटील यानी केले.तर आभार पी.आर.कोल्हे यानी केले.