वरणगाव, ता.भुसावळ- भाजपाचे ज्येष्ठ नेते व माजी महसुल मंत्री एकनाथराव खडसे यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला . यामुळे त्यांचा वरणगाव बसस्थानक चौकात पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केले . मात्र या संधीचा फायदा घेत पाकीटमार चोरट्यांनी तब्बल ६५ हजार रुपयाची चोरी केली . या घटनेची पोलीसात नोंद करण्यात आली .
भाजपाचे जेष्ठ नेते व माजी महसूल मंत्री यांनी भाजपावर नाराजी व्यक्त करीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत जाहीर प्रवेश केला . यामुळे त्यांच्या समर्थकांनी त्यांचे मुंबई ते मुक्ताईनगर या मार्गावर जंगी स्वागत केले . मात्र, या स्वागतादरम्यान पाकीटमार चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेत लाखो रुपयांची चोरी केली. यामुळे खळबळ उडाली असुन वरणगाव व मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असुन एका चोरट्यास मुक्ताईनगर पोलीसांनी शिताफीने अटक केली आहे .
वरणगावात खडसेंच्या करण्यात आला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे जिल्हा सरचिटणीस राजेंद्र चौधरी, तालुकाध्यक्ष दीपक मराठे, वरणगाव शहराध्यक्ष संतोष माळी, माजी नगरसेवक विष्णू खोले, गणेश चौधरी, रवींद्र सोनवणे, समाधान चौधरी, प्रकाश नारखेडे, माजी उपसरपंच साजिद कुरेशी, पप्पू जकातदार, राजेश चौधरी, गजानन वंजारी, युवक जिल्हा उपाध्यक्ष वाय.आर.पाटील, प्रशांत मोरे, ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष मनोज कोलते, सोहेल कुरेशी अनिल चौधरी व भाजपातुन राष्ट्रवादीत आलेले सुधाकर जावळे , प्रशांत पाटील, नितीन ( बबलु ) माळी, अरुणा इंगळे, रोहीणी जावळे, जागृती बढे, दूध फेडरेशनच्या संचालिका शामल झांबरे यांच्यासह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
सत्कार समारंभ सुरू असतांना कार्यकर्त्याच्या गर्दीचा फायदा घेऊन चोरट्यांनी अनेकांचे पाकिटे व खिशातील रोख रूपये लांबविल्याची घटना घडली. प्रसंगी पत्रकार सुरेश महाले यांच्या खिशातून देखील १३ हजार रूपये चोरांनी काढून घेतल्याने त्यांच्या फिर्यादिवरून वरणगाव पोलिसात या संशियिता विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. वरणगाव पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संदिपकुमार बोरसे यांनी ताबडतोब तपासचक्रे फिरवल्याने संशयीताला मुक्ताईनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सदरील संशयीत हा अट्टल गुन्हेगार असुन त्याच्यावर विविध पोलिस ठाण्यात घरफोडी ,चोरी, तसेच रेल्वे पोलिसांत जबरी लुटमारींचे गुन्हे दाखल असुन तो मुंबई येथून नाथाभाऊंच्या ताफ्याबरोबर मुक्ताईनगर पर्यंत होता नाथाभाऊचा जिथे जिथे सत्कार करण्यात आला त्या त्या ठिकाणी त्यानी पाकिटमारी रोख रकमांची चोरी केली असल्याचे पोलिसांनी सांगीतले असुन तो संशयीत एकटा नसुन त्याच्या सोबत आणखी ७ते ८ संशयीत असण्याची शक्यता असल्याचे देखील पोलिसांचा अंदाज आहे .