धुळे - महाराष्ट्र शासन छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय वनश्री पुरस्कार प्राप्त निसर्गमित्र समिती तर्फे आयोजीत वन्यजीव सप्ताहाचा समारोप धुळे येथील कार्यालयात संपन्न झाला. जिल्हाध्यक्ष डी बी पाटील हे अध्यक्षस्थानी होते.
नाशिक जिल्ह्याचे कार्याध्यक्ष व बागलाण तालुक्यातील टेंभे गावाचे सरपंच पर्यावरणप्रेमी भाऊसाहेब चिला अहिरे याचा टेंभे गावात घर तिथे वृक्ष लागवड व संवर्धन तसेच परिसरात भरपूर वृक्षारोपण केल्याबद्दल त्यांना ग्रीन मँन अवार्ड या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.
यावेळी निसर्ग-मित्र समिती चे संस्थापक प्रेमकुमार अहिरे,प्रदेश महासचिव संतोषराव आबा पाटील,नामपूरचे विनोद भाऊ सावंत,बापू गायकवाड आदी मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
तसेच याप्रसंगी प्रथम वृक्षांची पुजा करून कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले, पर्यावरण संतुलनासाठी वन्यजीवांचे संवर्धन होणे काळाची गरज आहे,असे टेंभे गावचे सरपंच भाऊसाहेब चिला अहिरे यांनी सांगितले तर ,डी बी पाटील,संतोषराव -पाटील,प्रेमकुमार अहिरे आदींनी वन्यजीवांचे महत्व याविषयी माहिती दिली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी धुळे शहराध्यक्ष प्रा. एच ए पाटील,धुळे तालुका संपर्क प्रमुख- तथा बोरीस चे शाखाध्यक्ष कांतीलाल देवरे, धुळे शहर संघटक हर्षल महाजन ,शिवाजी बैसाणे, शिंदखेडा तालुका संपर्क प्रमुख सुधीर सर,साक्री तालुका संपर्क प्रमुख राकेश जाधव,आदर्श शिक्षक सुरेश अहिरे ,धुळे तालुका संघटक किशोर अहिरे,आदर्श शिक्षक ईश्वर बैसाणे, धुळे शहर संपर्क प्रमुख वैभव पाटील, सामाजिक कार्यकर्ते लोटन वाघ,सुंदर पहेलवान,आदींनी विशेष परिश्रम घेतले,कार्यक्रमाचे प्रास्ताविक,सुत्रसंचालन संघटक सुकलाल बोरसे सर तर आभार प्रदर्शन धुळे शहराध्यक्ष प्रा. एच. ए पाटील यांनी केले.