वरणगाव ( प्रतिनिधी ) : केंद्र शासनाच्या नियोजनानुसार वरणगाव परीसरातील महामार्गाचे रूंदिकरणाचे बांधकाम सुरू असुन ठेकेदारांना संधीसाधु फुकट पुढाऱ्यांचा मानसीक त्रासात वाढ झाली असुन त्यामूळे महामार्गाचे काम खोळंबण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे
केंद्र शासनाच्या धोरणानुसार देशातील सर्वच महामार्गाचें नुतनीकरणासह रूंदिकरणाचे नियोजन करून ठेकेदारां मार्फत महामार्ग प्राधिकरण विभागाच्या अखत्यारीत काम सुरू करण्यात आले आहे परंतु केंद्र शासनाने सदरील कामात दुटप्पी धोरणाचा वापर केल्याने शासनाचा अतिरीक्त वाया जाणारा खर्च उपयोगी ठरेल याची काळजी घेऊन त्या अनुशंगाने सुरत ते नागपुर महामार्ग क्रमांक सहाचे काम टप्पे तयार करून सुरू करण्यात आले असुन तरसोद ते चिखली या टप्प्यात वरणगाव परीसर आहे या परीसरात भुसावळ ते मुक्ताईनगर तीस कि मी अंतरांत महामार्गांची उंची, रूंदि व ठराविक ठिकाणांवरील पुलांच्या भरतीकरीता सभोवतालच्या नदयांमधील उत्खनन करून भराव करणे जेणेकरून नदयांचे खोलीकरण होऊन पाण्याचा साठवा सुद्धा होईल आणि नियोजीत काम देखील होईल
परंतु नदयांमधील गौण खनिज काढून झाल्यास किंवा महार्गाचे काम अर्धवट राहिल्यास रूंदि करणा साठि मुरुम व पुलांच्या भरावां साठी महाजनको मधील राखेचा वापर करण्यात यावा या माध्यमातून नियमित कोळशाची निर्मित होणारी राखेची विल्हेवाट होऊन शासनाला आर्थीक लाभ होऊ शकतो त्या माध्यमातून शासन निर्णयानुसार महामार्गाचे नियोजीत काम सुरू आहे भुसावळ तालुक्यातील दिपनगर येथील महाजनको विज प्रकल्पातील कोळशाची निर्मित होणारी राख विल्हाळे शिवारातील वनविभागात शासनाने कोट्टयावधी रुपये खर्च करून बांधकाम केलेल्या बंडात कित्तेक दिवसांपासुन गोळा केली जात आहे. शासनाने दुटप्पी पर्याय निवडून लहान ठेकेदारांमार्फत राख वाहतूक पर्यायी म्हणून वरणगाव मार्गे केली आहे . तसेच विल्हाळे येथील बडातुन राख वाहतुक करतांना जडवाहनां मुळे रस्ता खराब झालेला आहे . सदर रस्ता दुरस्ती चे काम ही महामार्ग चे काम करणारे ठेकेदार करीत असल्याने शासनाचा दुरुस्तीला लागनारा निधी वाचणार आहे .
परंतु येथील संधी साधु गल्ली छाप फुकट पुढाऱ्यांनी ' ' ' ' ' ' 'गावकऱ्यांना राखेचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे . ' या मथळ्याखाली ठेकेदारांना वेठीस पकडण्या साठी आंदोलने, उपोषणे, मोर्चे, वर्तमानपत्रांच्या माध्यमातून वृत्त प्रसीद्ध करून घेणे, शासकिय अधिकाऱ्यांना धमकावणे, पोलिस प्रशासनाला वारंवार धारेवर धरणे, असे प्रकार सुरू केले आहे या माध्यमातून अधिकारी वर्ग कंटाळून ठेकेदाराला सांगुन यांना काहितरी काम द्या किंवा आर्थिक तडजोड करून दाती मीटवा असे सांगुन सुटका करून घेत आहेत आणि त्याला हे नकली पुढारी प्रतिसाद देखील देत आहेत परंतु एक तंटा मिटवला तर दुसरा तंटा उभा केला जात असल्याने ठेकेदार वर्ग देखील या संधी साधु लोकांना वैतागले असुन त्यांनी राखवाहतूक बाबत नविन पर्याय निवडला असल्याचे निदर्शनात आले असले तरी या गल्ली छाप पुढाऱ्यांमुळे महामार्गाचे काम खोंळबळ्याची शक्यता वर्तवली जात असुन वरीष्ठानी लक्ष देण्याची गरज आहे