मुंबई - सर्वांचे मार्गदर्शक तथा गॅस वन एनर्जी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे सर्वेसर्वा माननीय रणजीत चौधरी सर यांचे वडील टी. के. चौधरी सर यांचे आज सकाळी सात वाजता मुंबई येथे दुःखद निधन झाले.
लेवा समाज रत्न, महाराष्ट्र पोलीस विभागाचे अत्यंत प्रभावी व कर्तव्यदक्ष अधिकारी अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेले, तसेच क्रिएटिव्ह आय लिमिटेडच्या संचालक मंडळावर नॉन- एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर, वायर अँड वायरलेस (इंडिया) लिमिटेड झी ग्रुपमध्ये व्हाईस प्रेसिडेंट तसेच लष्कर सेवा आणि महाराष्ट्राचे माजी अतिरिक्त पोलीस महासंचालक म्हणून देखील महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
त्यांचे प्राथमिक शिक्षण फैजपूर येथील म्युनिसिपल शाळेत झाले. कानपूर विद्यापीठातून इंग्रजी साहित्य आणि राज्यशास्त्र विषयात बी. ए. ची पदवी घेतली. तसेच आग्रा विद्यापीठात देखील त्यांनी शिक्षण घेतले.