जैन मुनि पुलकित कुमार यांना पी. एच.डी.
जळगाव- अणुव्रत आंदोलनाचे प्रवर्तक गणाधिपति श्री तुलसी चे पावन सान्निध्यात आचार्य श्री महाप्रज्ञजी यांचा हस्ते १९९५ मधे दीक्षित मुनि श्री पुलकित कुमार जी यांना जैन विश्व भारती संस्थान, मान्य विश्वविद्यालय लाडनूं ( राजस्थान) च्या जैन विद्या आणि तुलनात्मक धर्म व दर्शन विभागातून  *भारतीय दर्शन में अपरिग्रह की अवधारणा: एक अध्ययन* या विषयवर  पी . एच. डी. ची डिग्री प्राप्त झाली। मुनि श्री चे शोध निर्देशक डा. आनंद प्रकाश त्रिपाठी होते। श्री जैन श्वेतांबर तेरापंथ धर्मसंघाचे  ११वे अधिशास्ता आचार्य श्री महाश्रमणजी ची आज्ञा आणि आशीर्वादा ने मुनि श्री यांनी सन् २०१६ ते २०२० च्या दरम्यान पी.एच.डी. अध्ययन केला। 

 

मुनि श्री पुलकित कुमार जी तेरापंथ धर्मसंघाचे "शासन स्तंभ" मंत्री मुनि श्री सुमेरमलजी स्वामी च्या सेवेत सतत २१ वर्ष पर्यंत राहिले,त्यांच्या सान्निध्यात राहून ३२ जैन आगमांचे आणि अन्य दर्शनांचा गहन अध्ययन केला।  

 

  मुनि श्री यांची लेखन, गायन , पठन- पाठन मधे विशेष आवड आहे।मुनि श्री चा जन्म लोणार (महाराष्ट्र) येथे झाला आहे आणि त्यांची  आई पण धर्मसंघात  साध्वी सोमश्री म्हणून दीक्षा झालेली आहे। या वर्षि मुनि श्री पुलकित कुमार जी यांची मुनि दीक्षा ला २५ वर्ष पूर्ण झाले। आता मुनि श्री उदितकुमारजी सोबत जळगावात चातुर्मास निमित्त विराजमान आहे।