केसीईच्या प.वि. पाटील विद्यालयात सरस्वती पूजनानिमित्त कुमारिका पूजन

जळगाव प्रतिनिधी । केसीई सोसायटी संचालित गुरुवर्य परशुराम विठोबा पाटील प्राथमिक विद्यामंदिर जळगाव येथे नवरात्रोत्सवानिमित्त कुमारिका पूजनाचे आयोजन करण्यात आले.


उपशिक्षिका स्वाती पाटील व सरला पाटील यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमांमध्ये आरुशी सरोदे, प्रचिती पाटील, मोक्षिता पाटील, अमृता खैरनार, छाया भिरुड, जान्हवी हटकर, खुशी खैरनार, निधी पाटील, जानवी ठाकूर, मिनाक्षी सपकाळे, पुजा सुतार या विद्यार्थिनींनी वेगवेगळ्या देवींची भूमिका करून व वेशभूषा धारण करून या कार्यक्रमाला उपस्थिती दिली तर शास्वत कुलकर्णी याने महिषासुर मर्दिनी स्तोत्र सादर केले. शाळेच्या मुख्याध्यापिका रेखा पाटील व प्रणिता झांबरे यांच्याहस्ते सर्व कुमारिकांचे पूजन करण्यात आले व नवरात्र उत्सवाच्या विविध दिवसांची ओळख करून देण्यात आली. कार्यक्रमासाठी केसीई सोसायटीचे शिक्षण समन्वयक चंद्रकांत भंडारी उपशिक्षिका धनश्री फालक, कल्पना तायडे तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.