सेवन सौल्स फाऊंडेशनतर्फे सॅनिटायझर व मास्क वाटप

जळगाव - जिल्हा प्रशासनाच्या नियमानुसार यंदाचे गणेश विसर्जन होत असून मनपा व पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होवू नये यासाठी त्यांची काळजी घेण्यासाठी शहरातील सेवन सौल्स फाऊंडेशन पुढे सरसावली असून मनपाचे व पोलीस कर्मचाऱ्यांना सॅनिटायझर व मास्क 500 किटचे वाटप करण्यात करण्यात आले. 


शहरातील मेहरुण तलाव येथे गणपती विसर्जनाची सोय जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आली आहे. मास्क व सॅनिटायझर किटचे वाटप करतांना संस्थेचे अध्यक्ष गौतम चौधरी, सोहम विसपुते, तुषार पाटील, पवन भुतडा, तेजस पाटील, सुष्मीत दिक्षीत, सनी राणे, भूषण पाटील, कपिल महाजन, रितेश महाजन आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.