प्रताप विद्या मंदिरात निवृत्त शिक्षकांचा सत्कार करून शिक्षक दिन साजरा 
चोपडा (प्रतिनिधी) : येथील चोपडा एज्युकेशन सोसायटी संचलित प्रताप विद्या मंदिर चोपडा येथे डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती म्‍हणजेच शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी निवृत्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा संस्थेच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला. कोरोना आजारामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत सोशल डिस्टंसिंग चे सर्व नियम पाळून हा कार्यक्रम साजरा करण्यात आला हे विशेष !

 

संस्थेच्या परंपरेप्रमाणे दरवर्षी निवृत्त शिक्षकांनी शाळेसाठी व विद्यार्थ्यांसाठी केलेल्या उत्कृष्ट कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला जातो.

 

यावेळी श्री आर बी देशमुख, श्री ए ए ढबू ,श्री डी एस पांडव, श्री एस आर पाटील, श्री डी के महाजन, श्री पी व्ही जोशी, सौ किर्तीबाला पाटील, श्री ए एस बाविस्कर, श्री पी ए पाटील, श्री एफ एन रावताळे, श्री एच ए पाटील, श्री पी आय वाघ, श्री पी आर जोशी,तसेच सेवक श्री बी जी अहिरे, श्री डी के वैद्य यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी सत्काराला उत्तर म्हणून सर्व सत्कारार्थी यांच्यावतीने नागलवाडी माध्यमिक विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक श्री ए ए ढबू यांनी संस्थेप्रती आदर व कृतज्ञता भाव व्यक्त केला. संस्थेमुळे आमच्या जीवनाला आकार मिळाले असे मनोगत व्यक्त केले.

 

संस्थेच्या सचिव माननीय माधुरीताई मयूर यांनी आपल्या मनोगतातून शाळेच्या प्रगतीत शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांचा मोलाचा वाटा आहे आणि संस्था त्यांचा आदर करते अशा भावना व्यक्त केल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन मुख्याध्यापक श्री डी व्ही याज्ञीक यांनी  तर आभार प्रदर्शन उपप्राचार्य श्री जे एस शेलार यांनी केले. प्रदीप कोळी यांनी ईशस्तवन सादर केले.

 

यावेळी चोपडा एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष मोरेश्वर देसाई, सचिव माधुरीताई मयूर, कार्यकारिणी सदस्य चंद्रहासभाई गुजराथी, रमेश जैन ,प्रताप विद्या  मंदिराचे मुख्याध्यापक डी व्ही याज्ञीक, उपमुख्याध्यापक श्री आर आर शिंदे, उपप्राचार्य श्री जे एस शेलार,नागलवाडी माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री वाय एच चौधरी,पर्यवेक्षक  श्री जी वाय वाणी, श्री आर बी पाटील, ,संस्थेचे समन्वयक गोविंदभाई गुजराथी तसेच श्री डी टी महाजन आदी सोशल डिस्टनसिंग च्या सर्व नियमांचे पालन करीत उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी पंकज नागपुरे ,देवेंद्र वैद्य,नितीन पाटील,विश्वास दलाल,तसेच सर्व शिक्षकेतर कर्मचारी बंधू यांनी परिश्रम घेतले