जळगाव- येथील पुष्कर बहुउद्देशिय संस्थेचे अध्यक्ष, जिव्हाळा फाऊंडेशनचे सचिव, संत नरहरी सोनार फाउंडेशनचे राष्ट्रीय सचिव, सामाजिक कार्यकर्ते तुषार सर यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या शहर संघटक पदी नियुक्ती करण्यात आली.
पुरस्कार प्राप्त- दलित राष्ट्रीय अकेडेमी दिल्ली व स्वामी विवेकानंद गौरव पुरस्कार, पुणे. पत्ता :- 7/A, पिंप्राळा रोड, भोईटे नगर, जळगाव. मो.- 7058396390,9028236790.
तुषार सर, आपली संघटना पत्रकारांच्या न्याय व हक्कासाठी लढा देत आहे. त्याअनुषंगाने आपणाकडून निस्वार्थ भावनेने सहकार्य अपेक्षित आहे. संघटन व समाजसेवेचे व्रत आपण त्यानिमित्ताने घेतले आहे. आपणाकडून नियमित हे कार्य होवो हीच सदिच्छा..
सदर नियुक्ती पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री. विजयजी सूर्यवंशी साहेब यांच्या आदेशान्वये कोअर कमिटीचे प्रदेशाध्यक्ष श्री .विनोद पवार यांनी जळगाव तालुका अध्यक्ष श्री. योगेश भामरे यांच्या अनुमोदनाने केली.