पर्यावरण शाळेत फुलतेय “फुलपाखरू उद्यान”* 
जळगाव- फुलपाखरू अत्यंत चित्ताकर्षक आणि नाजूकसा हा किटक आपल्या रंगबिरंगी पंखामुळे आणि त्याचबरोबर डौलदार उडण्याच्या लकबीमुळे लहान थोर सर्वांचेच लक्ष वेधून घेतो.

 

अतिशय आकर्षक असा हा किटक परिसरात असणे म्हणजेच स्वस्थ पर्यावरणाचे द्योतक आहे. पर्यावरणाचे संतुलन उत्तम राखण्यासाठी हे सुरेखसे फुलपाखरू अतिशय मोलाची भूमिका बजावत असते. अशा ह्या फुलपाखरांना कायमचा हक्काचा अधिवास मिळावा म्हणून जळगाव शहरात पर्यावरण शाळा , शारदाश्रम आणि श्रीमती एस. एल. चौधरी इंग्लीश मिडियम स्कूल(कोल्हे नगर) येथे फुलपाखरू उद्यान विकसत करण्यात येत आहे.

 

या अनुषगाने अनेक वनस्पती आणि वृक्ष प्रजातींची लागवड शाळेच्या परिसरात करण्यात आली आहे. समर्पण संस्थेच्या वतीने पर्यावरण आणि शिक्षण क्षेत्रात व्यापक कार्य सुरू आहे त , त्याचप्रमाणे विद्यापीठाच्या संलग्नतेने  पक्षीशास्त्र जैवविविधता आणि वन्यजीव संवर्धन हे तीन अभ्यासक्रमही कार्यान्वित करण्यात आले आहेत.अत्यंत निसर्गरम्य वातावरणात असलेल्या ह्या शाळेत सध्या फुलपाखरू उद्यान निर्माण केले जात आहे.

हे जळगाव शहरातील प्रथम फुलपाखरू उद्यान आहे. सध्या सप्टेंबर महिना हा फुलपाखरू महिना म्हणून देशपातळीवर साजरा केला जात आहे. याचे औचित्य साधून जळगाव येथील न्युकॉर्झव्हर आणि पुणे येथील नेमोफेलीस्ट आणि मुंबई येथील ख्यातनाम बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटी , वन्यजीव संवर्धन संस्था -जळगाव या  संस्थांच्यावतीने महाराष्ट्रातील प्रमुख शहरे व गावांमध्ये अनेक उपक्रम राबविले जात आहे. 

 

श्रीमती एस. एल चौधरी इंग्लीश मिडियम स्कूल येथे असे अनेक उपक्रम विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन घेतले जात आहेत प्रामुख्याने ड्रॉईंग कॉम्पीटिशन, प्रश्नमंजुषा, फोटोग्राफी कॉम्पीटिशन ,बटरफ्लाय रेस,  ख्यातनाम फुलपाखरू तज्ञांचे वेबिनारस इ. या स्पर्धेबरोबरच तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली शाळेत फुलपाखरांच्या अधिवासासाठी अनुकूल अशा वनस्पतींचे रोपण करून फुलपाखरांचे आकर्षित करणारे असे उद्यान बनविले जात आहे.

मागील दिड वर्षा पासून शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थी याच्या संयुक्त प्रयत्नाने तयार होत असलेले हे उद्यान जळगाव शहराच्या वैभवात नक्कीच भर घालेल, तसेच पर्यावरणप्रेमी आणि विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाचे उत्तम ठिकाण म्हणून उपलब्ध होणार आहे.