जळगावातील गोलाणी मार्केटमध्ये घाणीचे साम्राज्य; आरोग्य विभागाचे दुर्लक्ष

जळगाव - सध्या शहरातील कोरोनाने थैमान घातले असून त्यात पावसाने भर घातली असतांना ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगच्या ढिग साचले आहे. जळगाव शहरातील प्रमुख व्यापारी संकुलांपैकी एक असलेल्या गोलाणी मार्केटमध्ये ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिग साचल्याने परिसरात दुर्गंधी पसरली असून घाणीचे साम्राज्य झाले आहे. मात्र याकडे मनपाच्या आरोग्य विभागाच्या संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दुर्लक्ष केलेले दिसून येत आहे.


गोलाणी मार्केटमधील चौथ्या मजल्यावरील दुकान नंबर एफ 12 जवळील परिसरात गेल्या काही महिन्यापासून कचऱ्याचे ढिग पडल्याने परिसरात दुर्गधी पसरत असून रोगरार्इ पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. परिसरात असलेल्या शौचालयात अस्वच्छतेचा अभाव दिसून येत आहे.