भारतीय सेन्ट्रल रेल्वेच्या सल्लागारपदी श्री. चंद्रकांत (संदीप) कासार

जळगाव -  जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते व जळगाव जनता सहकारी बँकेचे अधिकारी श्री. चंद्रकांत (संदीप) कासार यांची भारतीय सेन्ट्रल रेल्वे द्वारे दिल्या जाणाऱ्या सेवा सुविधां सुलभ होण्याच्या हेतूने सल्लागार समितीमध्ये निवड करण्यात आली. श्री चंद्रकांत कासार यांची सदर समितीमध्ये नव्याने निवड झाली असून त्या संबधी निवड झाल्याचे भुसावळच्या वाणिज्य विभागाद्वारे पत्राद्वारे कळविण्यात आले आहे.


सदर निवडीचे माजी मंत्री श्री.गिरीशभाऊ महाजन, श्री. योगेश्वरजी गर्गे, आमदार श्री. राजूमामा भोळे,   श्री. दीपकराव घाणेकर, श्री. स्वानंदजी झारे,  श्री हितेशजी पवार, श्री. सतीशजी मदाने, श्री.राजेश आबा पाटील, श्री.किशोर चौधरी आदी सर्वांनी अभिनंदन केले.