अन्यथा तमाम फुले प्रेमीं व विविध संघटना कडून आंदोलनाचा इशारा...
धरणगांव - अशिया खंडातील मुलींची पहीली शाळा वाचविण्यासाठी व राष्ट्रीय स्मारक घोषीत करावे यासाठी " सावित्रीमाई फुले राष्ट्रीय स्मारक संघर्ष समिती, माळी समाज पंचमंडळ धरणगांव , छत्रपती क्रांती सेना , बहुजन क्रांती मोर्चा , महात्मा फुले ब्रिगेड , सावता माळी युवा संघ, म.फुले समता परिषद , महात्मा फुले युवा क्रांती मंच , भारत मुक्ती मोर्चा , बुद्धीष्ट इंटरनॅशनल नेटवर्क व समस्त फुले प्रेमी वतीने मा. तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात आले
सदरील जागा शासनाने लवकरात लवकर भूसंपादीत करून त्या वास्तुला राष्ट्रीय स्मारक म्हणुन घोषीत करून विकसीत करावे अन्यथा शासनाच्या विरोधात संपुर्ण महाराष्ट्रात " सावित्री माई फुले राष्ट्रीय स्मारक संघर्ष समिती व समस्त फुले प्रेमीं "च्या वतीने राज्यभर आंदोलन करण्यात येईल यांची शासनाने गांभीर्याने दखल घ्यावी...
निवेदन देतांना माळी समाज पंचमंडळाचे अध्यक्ष विठोबा महाजन , उपाध्यक्ष - योगराज माळी , सचिव - दशरथ महाजन , कोषाध्यक्ष - व्ही.टी. माळी , छत्रपती क्रांती सेनेचे जिल्हाध्यक्ष - लक्ष्मण पाटील , बामसेफ तालुकाध्यक्ष पी.डी. पाटील , बहुजन क्रांती मोर्चाचे तालुका संयोजक राजेंद्र वाघ , महात्मा फुले ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष नरेंद्र ( राजु ) महाजन , विभागीय अध्यक्ष - डॉ. देवरे , समता परिषदेचे धनराज माळी ,बामसेफ चे उपाध्यक्ष - हेमंत माळी , महासचिव - आकाश बिवाल , महात्मा फुले युवा क्रांती मंचचे आर.डी. महाजन , पुण्यनगरीचे युवा पत्रकार - जितेंद्र महाजन ,सावता माळी युवा संघाचे शहराध्यक्ष - जयेश महाजन , तालुकाध्यक्ष - निलेश माळी , प्रसिद्धी प्रमुख जितेंद्र महाजन ,
सामाजिक कार्यकर्ते विनायक महाजन , शेतकरी संघटनेचे अध्यक्ष गोरख देशमुख , बुद्धिष्ट इंटरनेशनल नेटवर्कचे निलेश पवार , गजानन महाजन , पवन महाजन , मनोज महाजन, पंकज महाजन , आकाश महाजन , ज्ञानेश्वर महाजन , चेतन माळी व धरणगांव शहरातील समस्त फुलेप्रेमी उपस्थित होते. सदर निवेदन शासनाच्या नियमात राहुन , मास्क लावुन देण्यात आले.