जळगाव - पोलिस प्रशासनात असंख्य पोलिस बंधू-भगिनी असून जे निस्वार्थ कर्तव्य बजावत आहे. आपल्या सेवेबद्दल ते कधीही खंत किंवा स्थुती करत नाही. पोलिस कर्मचार्यांसोबत काम करण्याचा अनुभव आपल्या शब्दातुन कथन करतात. जो आपल्या प्रशासनाच्या माध्यमातुन लोकसेवा करत असतो हे आपण सध्याच्या कोरोना प्रभावामुळे जाणतोच. पोलिस हा समाजाचा निस्वार्थ सेवक व संरक्षक असल्याचे मत जळगाव येथील महिला पोलीस कराटे प्रशिक्षक अश्विनी निकम यांनी राज्यस्तरीय कर्तुत्वान महिला नारीरत्न ऑनलाईन पुरस्कार प्राप्तप्रसंगी व्यक्त केले.
मुंबई येथे मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीच्या राज्यस्तरीय गुणिजन गौरव महासंमेलन 2020 साठी महाराष्ट्रातील एकमेव महिला पोलिस कराटे प्रशिक्षक अश्विनी प्रताप निकम यांची राज्यस्तरीय कर्तृत्ववान महिला नारीरत्न पुरस्कार 2020 यांची निवड करण्यात आली होती.
ऑनलाईन पुरस्कार वितरण सोहळा झूम अँपवर दि.30 ऑगस्ट2020 रोजी रविवारी संपन्न झाला. महाराष्ट्र राज्यातील विविध क्षेत्रांतून पुरस्कारासाठी निवडलेल्या 101 मानकर्यांना या सोहळ्यात मानाचा फेटा, मानकरी बॅच, महावस्त्र, गौरवपदक, सन्मानचिन्ह आणि मानपत्र या स्वरूपात राज्यस्तरीय पुरस्कार थाटात प्रदान करण्यात आला.
या सोहळ्यातच सर्व मानकर्यांना इ-मानपत्रे त्यांच्या व्हॉट्सअॅपवर देण्यात आली. यावेळी सुप्रसिद्ध राष्ट्रीय कीर्तनकार ह. भ. प. केशवजी महाराज सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.तर सुप्रसिद्ध तत्वचिंतक ह.भ. प. श्यामसुंदर महाराज, ज्येष्ठ समाजसेवक अशोकानंद, ज्येष्ठ साहित्यिक रमेश आव्हाड, ज्येष्ठ पत्रकार सदानंद खोपकर, सुप्रसिद्ध आदर्श शिक्षिका श्रीमती मनिषा कदम घार्गे, प्राचार्या श्रीमती रोशनी शिंदे, प्राचार्या श्रीमती कल्पिता , प्राचार्या श्रीमती प्रगती साळवेकर, सामाजिक नेत्या डॉ. शुभदा जोशी तसेच धडाडीच्या डॅशिंग आयकर अधिकारी श्रीमती अरुणा परब यांनी या समारंभाला विशेष पाहुणे म्हणून ऑनलाईन उपस्थिती नोंदविली आणि व्हिडिओद्वारे शुभ संदेश दिले. व्यासपीठावर शिवयोगी मीराताई आणि प्रगतिशील शेतकरी उद्योजक पांडुरंग मातेरे उपस्थित होते.संस्थापक अध्यक्ष अॅड. कृष्णा जगदाळे यांनी उपस्थितांना ऑनलाईन ग्लोबल गुणिजन शपथ प्रदान केली आणि गुणिजन संसदेत पुरस्कार प्राप्त मानकर्यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. हजारो टाळ्यांच्या साक्षीने हा ठराव मंजूर झाल्याचे त्यांनी जाहीर केले. सोहळ्याच्या समारोपात असंख्य महिला वर्गाने राष्ट्रवंदना सादर करून उत्साहात समारंभाची सांगता केली.
महिला पोलिस अश्विनी निकम यांची मागिल वर्षाच्या 1 एप्रिल 2019 पासुन जळगाव येथील पोलिस अधिक्षक पंजाबराव उगले यांच्या आदेशाने जळगाव पोलिस कराटे प्रशिक्षण वर्गासाठी नेमणुक करण्यात आली होती. दिलेल्या उत्तम संध्दीचे सोने करणे हा महिलांचा गुणधर्म असतो, हे आपण सर्व जाणतोच याच संधीचा फायदा मुलांच्या माध्यमातुन महिला पोलिस कराटे प्रशिक्षक अश्विनी निकम यांनी करुन घेतला. आपल्या कला कौशल्यातुन विद्यार्थ्यांना उत्तम खेळाडू बनवून त्यांना जिल्हास्तरापासुन, राज्यस्तरावरच नव्हे तर राष्ट्रीय स्तरावर पोहचविले. काही खेळाडू जिल्ह्यातूनच अपयश घेऊन परतले. परंतू क्रीडा विभाग महाराष्ट्र शासनाच्या शालेय कराटे स्पर्धा 2019 मध्ये पोलिस कराटे क्लबची कु.गौरी झोपे ही खेळाडू राज्यस्तरीय स्पर्धेपर्यंत पोहचली. एका वर्षाच्या सरावात हे अपयश देखिल गौरीच्या पालकांना यशाप्रमणे वाटत होते. परंतु अश्विनी निकम यांच्या मनात इतर खेळाडूंचा देखिल विचार मनात घोळत होता. त्यांनी शासन मान्यताप्राप्त व महाराष्ट्र ऑलंम्पीक संघटना मान्यताप्राप्त संघटनांच्या स्पर्धांमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना सहभागी केले. याचे फलित असे झाले की, कराटेसोबत किक बॉक्सिंगमध्ये 18 खेळाडूंनी घवघवीत यश संपादन केले. इतकेच नव्हे तर सहप्रशिक्षक महिला पोलिस जागृती काळे यांनां सोबतघेवून स्केटिंचे खेळाडू थायलंड येथे झालेल्या स्पर्धेपर्यत अंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत जळगाव जिल्ह्यातुन भारताचे नेतृत्व करणारी पोलिस क्लबची खेळाडू कु.समिक्षा महाले हिला देखिल मार्गदर्शन केले.
कराटे व स्केटिंगसोबत किंक बॉक्सिंग देखिल सांभळत आहेत. यातुनच अश्विनी निकम यांचे नाव महाराष्ट्राच्या संघटनेचे स्पोर्टस् कराटे डो संघटनेचे सचिव प्रकाश नकाशे यांच्या कानी पोहचले व त्यातुनच मुंबई येथिल मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीच्या संचालकांनी प्रस्ताव मागितले. पोलिस प्रशासनात महिला पोलिस कराटे प्रशिक्षक आणि महिला सबलीकरणासाठी नेहमी निस्वार्थ धडपड करणार्या अश्विनी निकम यांचे कौतुक करत त्यांना नारीशक्ती रत्न पुरस्काराने गौरविण्यात आले.
अश्विनी निकम पुढे म्हणाल्या की,माझे आदर्श जळगाव येथील पोलिस अधिक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी माझ्यावर विश्वास ठेऊन बंद पडलेले कराटे प्रशिक्षण वर्ग सुरु करण्याची परवानगी देण्यात आली.माझे प्रेरणास्थान गुरू व मार्गदर्शक पोलिस निरिक्षक राजेशसिंह चंदेल यांनी माझ्यातील उत्तम खेळाडू व कराटे प्रशिक्षक ओळखले व या प्रशिक्षण वर्गासाठी माझे नाव सुचविले. माझी नेमणूक पोलीस कल्याण मानव संसाधन केंद्र जळगाव येथे झाली. सर्व नविन अधिकारी कर्मचारी मला काय सहकार्य करतील हा देखिल विचार माझ्या मनात होता. परंतु पोलीस वेलफेअर येथील पी.आय. व कर्मचारी यांनी सूरवातीचे दोन महिने जेव्हा प्रशिक्षण वर्गात खेळाडू येत नव्हते तेव्हा धीर देत आपण प्रयत्न करू यश नक्की मिळेल असा दिलासा दिला. यातूनच मला जाणवते की, पोलीस प्रशासनात प्रत्येक अधिकारी व कर्मचारी हा निस्वार्थ मदत करणारा आहे. हे यावरून जाणवते असे अश्विनी निकम यांनी यांनी सांगितले. सध्या कोरोनामुळे कराटें प्रशिक्षण वर्ग बंद आहेत. पण सुरु झाले की, पुन्हा आपण आपले कर्तव्य जोमाने सुरु करू असे सकारात्मक विचार कराटे पोलीस प्रशिक्षक अश्विनी निकम यांनी केसरीराज शी बोलतांना व्यक्त केले.