सरस्वती विद्यामंदिर शाळेतील दोन शिक्षिकाचें उपक्रम जिल्हास्तरीय'आपला जिल्हा आपला उपक्रमांमध्ये दाखल'
डिजिटल ई बुक ने घेतली उपक्रमांची दखल.

जळगाव ( प्रतिनिधी) - सरस्वती विद्या मंदिर शाळेतील सुवर्णलता अडकमोल व सविता ठाकरे या दोन शिक्षिकांचे उपक्रमाची दखल जिल्हास्तरीय डिजिटल बुक आपला जिल्हा आपले उपक्रम यात घेण्यात आले. शाळेमध्ये दोघी  शिक्षिकानी विविध उपक्रम राबविले आहे पर्यावरण पूरक उपक्रम वृक्ष संवर्धन ,शाडू मातीपासून गणपती बनवणे , प्लास्टिक बंदी, नैसर्गिक रंगनिर्मिती रक्षाबंधन यासारखे विविध उपक्रम घेतले आहे

 

त्यापैकी प्लास्टिक बंदी व नैसर्गिक रंगनिर्मिती या उपक्रमाची दखलआपला जिल्हा आपले उपक्रम भाग 2 मध्ये घेण्यात आली . या डिजिटल बुक चे प्रकाशन शिक्षण सभापती माननीय रवींद्र पाटील शिक्षण विस्तार अधिकारी विजय पवार, राहुल चौधरी तसेच इतर मान्यवरांच्या उपस्थितीत झाले.

 

शाळेचे नाव जिल्हास्तरीय उपक्रमांमध्ये गेल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष मनोज पाटील संचालिका प्रतीक्षा पाटील प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका कल्पना वसाने माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका दिपाली देवरे यांनी शुभेच्छा देऊन कौतुक केले आहे.