राजनंदिनी बहुउद्देशिय संस्थेतर्फे राष्ट्रीय शिक्षक दिनानिमित्त "आदर्श शिक्षक पुरस्कार

जळगाव - राजनंदिनी बहुउद्देशिय संस्थेतर्फे राष्ट्रीय शिक्षक दिनानिमित्त "आदर्श शिक्षक पुरस्कार 2020-21" चे जळगावातील काबरा फाउंडेशनमध्ये फाउंडेशनचे डॉ.महेंद्र काबरा, डॉ.ममता काबरा आणि संस्थेच्या अध्यक्षा संदिपा वाघ यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरुपात वितरण झाले.


या वेळी डॉ.मिलिंद बागुल, उमाकांत महाजन, सुनील चौधरी, छाया पाटील, सुरेखा भदाने, संगीता पाटील यांना पुरस्कार वितरण करण्यात आले. या उपक्रमासाठी विजय लुल्हे आणि महाराष्ट्र खान्देश कुणबी पाटील वधू-वर सूचक केंद्राचे आणि गौरी उद्योग समूहाचे संचालक सुमित पाटील यांचे सहकार्य लाभले.