जळगाव प्रतिनिधी । मराठा आरक्षण लागू करण्यासाठी जळगाव जिल्हा मराठा समाज्याचावतीने 15 सप्टेंबर रोजी माननीय जिल्हा अधिकारी प्रतिनिधी अतिरिक्त जिल्हाधिकारी नितीन महाजन याना सकल मराठा समाज्याच्यावतीने निवेदन देण्यात आले.
राज्यात मराठा आरक्षनाचा निर्णय तात्काळ लागू व्हावा सर्वोच्य न्यायालयाची स्थगिती उठवून शिक्षण व नौकरीतील आरक्षण देण्यात यावे सुप्रिम कोर्टाची स्थगिती उठवून मराठा आरक्षणाच्या निर्णयाला अंमलबजावणी व्हावी अशी मागणी निवेदनातुन सकल मराठा समाजाने केले असुन आरक्षण लागू न झाल्यास लाखोच्या संख्येने मोर्चे काढुन आक्रोश आंदोलन करु असा इशारा दिला शिष्टमंडळाचे नेतृत्व मराठा सेवा संघाचे अध्यक्ष रामदादा पवार यांनी केले. प्रा सुनिल गरूड, सुमीत पाटील, प्रमोद पाटील, भगवान शिंदे, रितेश पाटील आदी समाज बांधव हजर होती. सदर निवेदन देण्याचे आयोजन डी.डी.बच्छाव यांनी केले होते.