श्री चंदनशेष गणेशोत्सव मंडळाने साधेपणाने दिला बाप्पाला निरोप

 खामगांव -  खामगांव शहरातील देशमुख प्लाॅट भागातील श्री चंदनशेष क्रिडा व व्यायाम प्रसारक मंडळाने कोरोनाच्या पाश्र्वभुमीवर यावर्षीचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करुन निसर्ग आणि वसुंधरेच्या संवर्धनाचा संकल्प घेतला होता. त्या अनुषंगाने मंडळाने गणेश चतुर्थीच्या दिवशी  सी.एम.हेल्थ क्लब येथे शाडु पासुन बनविलेल्या गणेश मुर्तीची स्थापना करुन पर्यावरण पुरक गणेशोत्सव साजरा केला. अनंत चतुर्थीच्या दिवशी 1 सप्टेंबर रोजी गणरायाला ब्रम्हवृंदांच्या हस्ते विधीवत पुर्जा अर्चा करुन माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्या हस्ते आरती करुन जलकुंडात जड अंतकरणाने गणपत्ती बाप्पांचे विसर्जन करण्यात आले.  


श्री चंदनशेष क्रिडा व व्यायाम प्रसारक मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकत्र्यांनी संयम ठेवुन शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सुचनांचे तंतोतंतपणे पालन केले. मंडळामध्ये दररोज सकाळी व  सायंकाळी विघ्नहर्ता गणरायाचे ब्रम्हवृंदांच्या हस्ते आरती करण्यात आली. यावर्षीचा गणेशोत्सव आरोग्यत्सव म्हणुन साजरा करुन चंदनशेष मंडळाने आरोग्याविषयी जनजागृती केली. सामाजिक,सलोखा व एकोपा जपण्यासाठी मंडळातील सदस्यांनी प्रतिज्ञा घेतली.  


मंडळाच्या या स्तृत्य उपक्रमाबदद्ल माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी मंडळाचे सर्व पदाधिकारी व सदस्य यांचे आभार मानले.अनंत चतुर्थीच्या दिवशी सकाळी 9 वाजता जलकुंडात श्रींचे विसर्जन करतांना विघ्नहत्र्याच्या चरणी कोरोनाचे संकट टळुन सर्वांना उत्तम आरोग्य लाभो अशी प्रार्थना करण्यात आली. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या अश्या घोषणा देत बाप्पाला साधेपणाने भावपुर्ण निरोप देण्यात आला.


यावेळी राणा दिग्वीजयसिंह सानंदा, श्री.चंदनषेष मंडळाचे प्रताप कदम, अमर पिंपळेकर,सोनु जाधव,सुरेंद्र चव्हाण,मंगेष खोंड, अतुल संत, गटटु जाधव,संतोष आटोळे, नरसिंग झापर्डे, दिपक लुलवाणी,मंगेष जाधव,संजु ढोले,षुभम जाधव, मनोज आसेरी,नमन गांधी यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.