भारतीय जनता पार्टी व शिंदे अकॅडमी यांचा अभिनव उपक्रम

पाचोरा - पाचोरा शहरातील सर्व गणेश भक्तांना भारतीय जनता पार्टी, पाचोरा व शिंदे अकॅडमी आव्हान करते की, कोविड - १९  चा प्रादुर्भावामुळे शासनाच्या आदेशानुसार नागरिकांना स्वतः जाऊन विसर्जन करता येणार नाही. त्यामुळे बापाच्या विसर्जना साठी आपल्याला बाहेर सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमता येणार नाही म्हणून आम्ही आपल्या सर्वांच्या घरातील बाप्पाचे विसर्जनाकरिता गणेश मूर्ती संकलन करणार आहोत.


संकलित मूर्तीची विधिवत पूजा -अर्चना करूनच विसर्जन करण्यात येईल. तरी सर्व गणेश भक्तांना विनंती आहे की, विसर्जनासाठी गर्दी न करता खालील नमुद केलेल्या ठिकाणी गणेश मूर्ती देऊन आम्हास सहकार्य करावे. संकलन केंद्रे याप्रमाणे आहेत या केंद्रांवर येवुन आपले बाप्पा व निर्माल्य सुपुर्द करावे.


गणेश कॉलनी, विवेकानंद नगर,आशीर्वाद ड्रिमसीटी, गिरणा पंपिंग रोड,  पुनगाव रोड, भवरलाल जैन नगर, ठाकरे नगर, आनंद नगर, दुर्गा नगर, आदर्श नगर आशीर्वाद कॉटेज, गणपती नगर, जिजामाता कॉलनी, विश्रामगृह परिसर, साने गुरुजी कॉलनी, प्रोफेसर कॉलनी, जयकीसान कॉलनी, चिंतामणी कॉलनी, मानसिका कॉलनी, संघवी कॉलनी, बाजोरिया नगर, इंदिरा नगर, गाडगेबाबा नगर,भास्कर नगर,कृषी कॉलनी, शामजी नगर, कालिका नगर, व्ही.आय.पी. कॉलनी, तलाठी कॉलनी, शाहूनगर, शंकरनगर, जनता वसाहत, छत्रपती शिवाजी नगर, हनुमान नगर, गांधी चौक, सोनार गल्ली, हिंद ऑईल मिल रोड, छत्रपती संभाजीनगर, उल्हास टॉकीज परिसर, आठवडे बाजार परिसर, श्रीराम चौक, पंचमुखी हनुमान चौक, कोंडवाडा गल्ली,कृष्णापुरी, शिव कॉलनी, त्र्यंबक नगर, गोविंद नगर, गुरूदत्त नगर, वरखेडी नाका,सिंधी कॉलनी, श्रीराम नगर मोंढळा रोड याठिकाणी श्री गणेशांची मुर्ती व निर्माल्य स्विकारण्यात येणार आहे.