पारोळा:- प्रतिनिधी - पारोळा तालुक्यातील आदर्श गाव येथिल मुख्यध्यापिका पाकिज उस्मान पटेल यांना तीन गौरवशाली पुरस्काराने गौरविण्यात आले आहे,आनंदी गुरूकुल अॅकडमी विध्यार्थी विकास केंद्र अकोला यांचा वतीने प्रयोगशिल शिक्षक म्हणुन तर राजनंदीनी बहुउद्दशिय संस्था जळगांव कडुन आदर्श शिक्षिका राज्यस्थरीय कर्तु्त्ववान शिक्षक पुरस्कार मुख्यध्यापक गटातुन त्यांना देण्यात आला.
लाॅकडाउन च्या काळात राज्यस्तरिय शिक्षक यांनी एकत्र येत राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार ही नाविन्यपुर्ण स्पर्धेचे आयोजन केले होते,या स्पर्धेतही पाकिजा पटेल ह्या मानकरी ठरल्या तसेच ५ सप्टेंबर शिक्षक दिनाचे औचित्य साधत पारोळा व्यपारी महासंघाच्या वतीने ही पाकीजा पटेल यांना सन्मानीत करण्यात आले,या प्रसंगी पारोळा व्यापारी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष केशव क्षत्रिय उपाध्यक्ष अशोककुमार लालवानी,संजय पाटील गायत्री परिवारचे गोटुनाना,अमृत क्षत्रिय, पटेल सर, तसेच व्यापारी सदस्य उपस्थित होते,