राज्यस्तरीय शिक्षक ध्येय नवोपक्रम स्पर्धेत ध्रुवास राठोड यांच्या नवोपक्रमाची निवड

चाळीसगांव : राज्यस्तरीय शैक्षणिक साप्ताहिक शिक्षक ध्येय यांच्या मार्फंत शिक्षक दिनानिमित्ताने आयोजित नवोपक्रम स्पर्धेत सामाजिक न्याय विभाग संचलित शासकिय निवासी शाळा चाळीसगांवचे उपक्रमशील शिक्षक श्री ध्रुवास राठोड यांनी राबविलेला 'प्रवास स्पर्धा परीक्षेचा-होऊया प्रज्ञावंत विद्यार्थी' या नवोपक्रमाचे राज्यस्तरीय शिक्षक ध्येय पुरस्काराकरीता निवड करण्यात अाली.


 राज्यात तीन लाखांपेक्षा जास्त वाचक वर्ग असलेले साप्ताहिक शिक्षक ध्येय मार्फंत विद्यार्थी प्रगत होण्याच्या दृष्टीने जे शिक्षक मनापासुन पर्यंत्न करीत आहे.त्यांनी केलेल्या सर्वोत्कृष्ठ नाविन्यपुर्ण उपक्रमाची माहिती सर्व शिक्षकांना व्हावी.या हेतुने सात गटात स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.यानुसार सर्वोत्कृष्ट दहा नवोपक्रमाची निवड करण्यात येणार होती. या स्पर्धेत शिक्षक गटास इतर गटाच्या तुलनेने उत्तम प्रतिसाद लाभला.


या स्पर्धेचा निकाल शिक्षक दिनी जाहीर करण्यात आलेला असुन या राज्यस्तरीय स्पर्धेत राठोड यांचा विद्यार्थ्यांचा सर्वांगिण गुणवत्तापुर्ण विकास करुन विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत यश मिळवून देणार्‍या नाविन्यपुर्ण उपक्रमाची निवड करण्यात आली.या निवडीकरीता श्री ध्रुवास राठोड यांना सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन राज्यस्तरीय कर्तृत्ववान शिक्षक ध्येय पुरस्काराने गौरव केला जाणार आहे.


याकरीता या कर्तृत्ववान शिक्षकास मिळालेल्या या गौरवाकरीता समाजकल्याण सहा.आयुक्त श्री योगेश पाटील, गटशिक्षणाधिकारी श्री विलास भोई, मुख्याध्यापक सावळे, शिक्षकवृंद तसेच शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांकडुन राठोड यांचे कौतुक करण्यात आले.या अवालिया शिक्षकाने जिल्ह्यांतच नव्हे तर राज्यातील एक धडपडणारे कर्तृत्ववान युवा शिक्षक म्हणुन ओळख निर्माण केली आहे.