रोटरी वेस्टतर्फे इकरा मेडिकल कॉलेजमध्ये ऑक्सीजन पाईप लाईन प्रणालीचे लोकार्पण

जळगांव ः येथील रोटरी क्लब ऑफ जळगांव वेस्टतर्फे जिल्ह्यात अमळनेर, भडगांव, बोदवड नंतर शहरातील रुग्णांसाठी इकरा युनानी मेडिकल कॉलेज येथे 38 बेडसच्या ऑक्सीजन पाईप लाईन प्रणालीचे लोकार्पण करण्यात आले.


याप्रसंगी जिल्हाधिकारी अभिजित राऊत, अप्पर जिल्हाधिकारी, गोरक्ष गाडीलकर, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.बी.एन.पाटील, इकरा एज्युकेशन सोसायटीचे गफ्फार मालिक, करीम सालार, रोटरी वेस्टचे अध्यक्ष तुषार चित्ते, माजी अध्यक्ष डॉ.राजेश पाटील, गनी मेमन, योगेश भोळे, कुमार वाणी, सागर पाटील, शंतनू अग्रवाल यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी राऊत यांनी रोटरी वेस्टने अवघ्या सहा दिवसात इकरामधील रुग्णांसाठी 30 बेडस व आयसीयु मधील 8 बेडस अशा 38 बेडस्साठी ऑक्सजीन पाईप लाईनची उभारणी करुन दिल्याबद्दल कौतुक करुन अभिनंदन केले.


कोरोना संक्रमण रोखणे व रुग्णांच्या वैद्यकीय सुविधांच्या मदतीसाठी जिल्हाधिकार्‍यांच्या आवाहनानुसार रोटरी वेस्टने गेल्या दोन महिन्यात जिल्ह्यात ग्रामीण भागात तीन तर शहरात एक अशा चार ठिकाणी ऑक्सीजन पाईप लाईन उभारणीसाठी देणगीदारांच्या आर्थिक सहकार्याने योगदान दिले आहे. त्यात रोटरी वेस्टचे जेष्ठ सदस्य चंद्रकांत सतरा यांचे देगणीदारांच्या संपर्कासाठी विशेष उल्लेखनीय परिश्रम आहेत, असे माजी अध्यक्ष व प्रकल्प समन्वयक डॉ.राजेश पाटील यांनी सांगितले.