विवेकानंद प्रतिष्ठान इंग्लिश मिडियम स्कूल मध्ये शिक्षक दिन ऑनलाइन पद्धतीने उत्साहात साजरा

शिक्षक दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा


जळगाव - भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा 5 सप्टेंबर रोजी जन्मदिन शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यावेळेस सरस्वती पूजन व डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन शाळेचे प्राचार्य ज्ञानेश्वर पाटील व माजी विद्यार्थी अमित सोळुंके (गुरु-शिष्य) यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन दिपाली बडगुजर यांनी केले.


कार्यक्रमाची माहिती संदेश शेवाळे तसेच दीपश्री कोळी यांनी विद्यार्थ्यांना धौम्य ऋषी आणि अरुणी ही गुरुशिष्यांची गोष्ट सांगितली. शितल सोनवणे व नकुल सोनवणे यांनी गीत सादर केले. शिक्षक दिनाचे औचित्य साधून इयत्ता तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. “माझा आवडता शिक्षक” हा विषय निबंधासाठी देण्यात आला होता. विद्यार्थ्यांनी आपल्या आवडत्या शिक्षकांविषयी प्रेम व कृतज्ञता व्यक्त केली.


निबंध स्पर्धेचे विजेते :- इयत्ता ३री प्रथम क्रमांक- पुष्कर राहणे (ज्ञानदा), वेदांत पाटील (हंसवाहिनी), चिन्मय नेवे (कादंबरी). द्वितीय क्रमांक:- विधान पाटील (ज्ञानदा), काव्या पवार (हंसवाहिनी), राधा गर्जे (कादंबरी). तृतीय क्रमांक:- प्रथमेश अग्रवाल (ज्ञानदा), आर्यन बडगुजर (हंसवाहिनी), उत्तेजनार्थ क्रमांक- खुशी बाविस्कर (ज्ञानदा). इयत्ता चौथी प्रथम क्रमांक आर्यन सत्रे वैदेही अक्षय कोतकर (मैथिली), प्रथमेश शिंपी (भूमी), द्वितीय क्रमांक:- जिज्ञासा पाटील (वैदेही), रायन पाटील (मैथिली),सिद्धार्थ वाघ (भूमी), तृतीय क्रमांक:- आदित्य कुलकर्णी (वैदेही), समीर कुलकर्णी (मैथिली) उत्तेजनार्थ- क्रमांक चिराग जाधव (वैदेही), अपूर्वा पवार (वैदेही).


तसेच पूर्व  प्राथमिक  विभागात  ऑनलाईन  शिक्षकदिन  साजरा  करण्यात  आला.  शिक्षकदिनासाठी  पालकांना  वेग-वेगळे  विषय  देण्यात  आले  होते. त्या  विषयावर  पालकांनी  व्हिडिओ  बनवून  पाठवले , आणि  त्यातूनच  पालकांनी  शिक्षकदिन  अनुभवला. ज्या  पालकांनी  शिक्षक म्हणून भूमिका  साकारली  त्याची  नावे, नर्सरी  मधून - सौ इंगळे, सौ. उज्वला  पाटील, सौ  श्रद्धा  पाटील, सौ  रूपाली  पाटील, सौ  वर्षा  पाटील, सौ  स्वाती  संदानशिवे, सौ.सोनवणे, सौ. वाणी, सौ  शिरसाठ, सौ. गोल्ला, जुनिअर केजी  मधून - सौ. महाजन, सौ  जोशी, सौ. नेवे, सिनियर केजी  मधून  - सौ  हनुमंते, सौ सोनवणे, सौ. शर्मा, सौ  ठाकूर, सौ. पाटील, सौ  गर्जे, सौ. पवार, सौ. दर्शना  पवार, सौ  निळे, सौ  पाठक, सौ  पाटील. या  सर्व  पालकांनी  आनंदाने  शिक्षकदिना साठी  मनापासून  सहकार्य  केले. शिक्षकदिन आनंदात  साजरा झाला.कार्यक्रम प्रमुख म्हणून सौ. चारुशीला जोशी यांनी काम पाहिले. तसेच या कार्यक्रमास सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले