जळगाव जिल्ह्यात आज ८६२ रूग्ण कोरोना पॉझिटीव्ह

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा प्रशासनाकडून आज आलेल्या कोराना अहवालात जिल्ह्यात ८६२कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले. आजच्या अहवालात जळगाव शहरात २७७ कोरोना बाधित रूग्ण आढळून आलेत. तर भुसावळ, पारोळा आणि चाळीसगाव तालुक्यातही रूग्ण वाढ झाल्याचे दिसून येत आहे. आजच ८२४ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे.


आजची आकडेवारी
संपूर्ण तालुक्यांचा विचार केला असता, जळगाव शहर-२७७; जळगाव ग्रामीण-४६; भुसावळ-७१; अमळनेर-४३; चोपडा-५५; पाचोरा-३१; भडगाव-३०; धरणगाव-३६; यावल-२२; एरंडोल-३५, जामनेर-२६; रावेर-१५; पारोळा-६९; चाळीसगाव-६१; मुक्ताईनगर-१७, बोदवड-५ व दुसर्‍या जिल्ह्यांमधील २३ असे एकुण ८६२ रूग्ण आढळून आले आहेत.


जिल्हानिहाय आकडेवारी
जळगाव शहर-८६०६; जळगाव ग्रामीण-२००८; भुसावळ-२२२२; अमळनेर-३३४४; चोपडा-३११०; पाचोरा-१५२८; भडगाव-१५४८; धरणगाव-१६७१; यावल-१२४२; एरंडोल-२३६४, जामनेर-२६२७; रावेर-१६५६; पारोळा-१९४१; चाळीसगाव-२४४०; मुक्ताईनगर-१०२६, बोदवड-५६९ व दुसर्‍या जिल्ह्यांमधील २६७ असे एकुण ३८ हजार १६९ रूग्ण आढळून आले आहेत.


आजच्या रिपोर्टनंतर जिल्ह्यातील आजवरच्या कोरोना बाधीतांची संख्या ३८ हजार १६९ इतकी झालेली आहे. यातील २७ हजार २११ रूग्ण बरे झाले आहेत. यात आजच ८२४ रूग्णांनी कोरोना विषाणूवर मात केली आहे. तर आज १४ मृत्यू झाले असून मृतांचा एकुण आकडा ९६० इतका झालेला आहे. दरम्यान आता सध्या ९ हजार ९९८ रूग्णांवर उपचार सुरू आहेत.