कोविड-19 लॉकडाऊन कालावधीत खर्या गरजूंना मदत
जळगांव - येथील दर्जी फाऊंडेशन ही संस्था सामाजिक क्षेत्रात सदैव कार्यरत असते. कोविड-19 लॉकडाऊन कालावधीत सर्व लोकांच्या हाताला काम नाही. त्यामुळे समाजातील काही घटकांकडून प्राथमिक गरजा सुध्दा पूर्ण होत नाहीत. त्यात प्रज्ञाचक्षू बांधवांच्या हाताला काम कुठे मिळेल हे एक मोठे समाजापुढे आव्हान आहे.
त्यात एका प्रज्ञाचक्षू कैलास ठोंबरे या बांधवाचा गोपाल दर्जी यांना फोन आला. त्यांनी त्यांच्या उपयुक्त वस्तूंची मागणी व समस्या त्याच्याकडे माडली. त्यामुळे त्वरित दर्जी फाऊंडेशनच्या माध्यमातून 1 महिनाभर पुरेल असा उपयुक्त गृहपयोगी (किराणा) प्रज्ञाचक्षू 38 सदस्यांना देण्याचे जाहिर करून आज त्यांच्या पिंप्राळा हुडको येथील प्रज्ञाचक्षू वस्तीत जावून दर्जी फाऊंडेशन परिवारातील सदस्यांनी गृहपयोगी (किराणा) वस्तूंचे वाटप केले.
यात गोपाल दर्जी यांनी समाजाला असे आवाहन केले की, ज्यांना जे शक्य असेल ते प्रज्ञाचक्षू लोकांना मदत करावी व थोडेसे समाजाचे ऋण फेडण्याचा प्रयत्न करावा.