जळगाव - जिल्ह्यात बस सेवा सुरु करण्यात आली आहे. तसेच शहरातील देवकर अभियांत्रिकी महाविद्यालयातील शासकीय आयुर्वेद महाविद्यालयात सुरू होणाऱ्या नॉन-कोविड रुग्णालयात जिल्हा प्रशासनाकडून नेत्ररोग सर्जरी, अस्थिरोग, स्रीरोग व प्रसूती कक्ष, अतिदक्षता कक्ष इत्यादी पाच बाह्यरुग्ण तपासणी कक्ष(ओपीडी) व पाच शस्त्रक्रिया कक्ष लवकरच सुरू करण्यात येणार आहेत. तसे रक्त ,लघवी, एक्स-रे व सोनोग्राफी सुविधाही उपलब्ध करण्यात येणार आहे.
त्याच ठिकाणी बाह्यरुग्ण तपासणी कक्षात कोरोना संसर्ग नसलेल्या (नॉन कोविड) रुग्णांवर वैद्यकीय उपचार केले जाणार असल्याने प्रस्तुत अंतर शहरापासून सहा किलोमीटर असल्याने गुलाबराव देवकर महाविद्यालयापर्यंत रुग्णालयात रुग्ण पोहोचविने सोयीचे व्हावे म्हणून जळगाव एसटी महामंडळाने मान्य प्रवासी भाडे दरानुसार प्रवासी भाडे आकारून दर तासाला एक बस सेवा सुरू करून रुग्णांना उपलब्ध करावी असे निर्देश विभाग नियंत्रक राज्य परिवहन, जळगाव यांना मा. जिल्हाधिकारी ,जळगाव. यांनी दिलेले आहेत प्रस्तुत जळगाव शहर ते गुलाबराव देवकर महाविद्यालयापर्यंत शहर बससेवेचे फेरी शिरसोली पर्यंत वाढविण्यास माननीय, जिल्हाधिकारी यांनी मान्यता प्रदान केल्यास चिंचोली येथील रहिवासी नागरिकांनी आरोग्यसेवेचा लाभ घेता येईल. तरी सदरहू फेरी "जळगाव शहर - गुलाबराव देवकर महाविद्यालय- शिरसोली व परत" अशी सुरू करण्याची मागणी करण्याची , श्री.विष्णू घोडेस्वार, सरचिटणीस,जळगाव शहर जिल्हा काँग्रेस कमिटी यांनी केली आहे.