ओझर ( नाशिक ) - महाराष्ट्र पुरोगामी पत्रकार संघाची भुमिका सकारात्मक असुन सामाजिक भावनेतुन स्थापित झालेल्या संघाचा उदारमतवादी दृष्टीकोन असुन या विचारप्रवाहात सामील होण्याचे आव्हान महाराष्ट्र पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विजयकुमार सुर्यवंशी यांनी केले.निफाड तालुक्यातील ओझर येथे पत्रकारांची कार्यशाळा , कोवीड योद्धा सन्मान ,परीचय संमेलन या कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्षिय भाषणात मनोगत व्यक्त करताना ते बोलत होते.
सामाजीक , शैक्षणिक सांस्कृतिक , शेती, आरोग्य जलसंवर्धक ,या उपक्रमाबरोबर शोषित व पिडीत घटकांचा विकास महीला सबलीकरण शिक्षणाचा प्रसार या हेतुना संघात अग्रक्रम देण्यात आला आहे, या विचारधारेशी बांधील असलेल्या जागृत व सक्षम पत्रकारांचा संघाच्या सहकार्याने संघाचे काम अखंडीतपणे सुरु राहण्यासाठी मोलाच्या मार्गदर्शनास प्राधान्य दिले जाईल अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन व प्रतिमापुजन करण्यात आले.
महाराष्ट्र राज्य कोअर कमीटी निमंत्रक व राज्य निवड समीती सदस्य प्रविण दोशी यांनी प्रास्तविक केले.संघ स्थापनेचा हेतु,उद्देश,कार्यप्रणाली, संघाची आचारसंहीता परिचय संमेलनाची आवश्यकता याबाबींची माहीती देण्यात आली.यानंतर संस्थापक विजय सुर्यवंशी कोअर कमीटी सचिव प्रकाश चितळकर,उपाध्यक्ष संतोष निकम,उद्योजक व कोअर कमीटी निमंत्रक गणेशजी जाधव,प्रवक्ता कृष्णा बेडसे,महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विनोदजी पवार निमंत्रक प्रल्हाद पाटील महाराष्ट्र संघटक छोटुलाल मोरे संघटक संतोष परदेशी सचिव सुभाष परदेशी .हेमलता परदेशी सुलभा पवार उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष वैभव पाटील उपाध्यक्ष संदिप अवधुत उत्तर महाराष्ट्र विभागीय सदस्य गोविंद थोरात,अमोल भालेराव सल्लागार अनिल दवणे सुनिल मगर रफिक सैय्यद मनिषा पवार( अभिनेत्री ) नाशिक जिल्हाध्यक्ष संजय दोंदे संतोष सोणवणे व सौं दोंदे,सोनवणे व पुरोगामी पत्रकार संघाचे सदस्य पदाधिकारी व निमंत्रीत मान्यवर उपस्थित होते.
विविध मान्यवरांनी याप्रसंगी मनोगत व्यक्त केले जिल्हाध्यक्ष संजय दोंदे यांचा अभिष्टचिंतन सोहळा याप्रसंगी साजरा करण्यात आला. नाशिक महापालीका नगरसेवक संजय साबळे,नगरसेवक भगवानजी दोंदे जि प सदस्य ओझर यतिनजी कदम,राजाभाऊ दोंदे ,प्रकाश बागुल,सोनु दोंदे व मान्यवरांनी याप्रसंगी शुभेच्छा दिल्या.