मुंबई (प्रतिंनिधी )- गेल्या तीन ते चार महिन्यापासून लॉकडाऊन सुरु असल्याने विद्यापीठे, महाविद्यालये, शाळा पूर्णपणे बंद असून मागील वर्षाच्या काही परीक्षा प्रशासनातर्फे रद्द करण्यात आल्या होत्या. आता शैक्षणिक वर्ष २०२० सुरु झाले असून शाळा सुरु करणेबाबत सरकारने अजून हि नकारच दिला आहे. परंतु विद्यार्थांना ऑनलाइन शिक्षण देणे बंधन कारक केले आहे. त्या अनुषंगाने काही शाळामध्ये ऑनलाइन शिक्षण देणे सुरु आहे परंतु यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांकडे स्मार्टफोन, लॅपटॉप, संगणक व इंटरनेटची सुविधा असणे गरजेचे आहे. परंतु काही विद्यार्थी असे आहेत कि त्यांची परिस्थिती स्मार्टफोन, लॅपटॉप, संगणक किंवा इंटरनेट घेण्यासारखी नाही. अशा विद्यार्थ्यांना सरकारतर्फे मोफत टॅब व इंटरनेट सुविधा करून देण्यात यावी अशी मागणी पुरोगामी पत्रकार संघातर्फे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे संस्थापक अध्यक्ष विजय सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष प्रवीण परमार, महाराष्ट्र कोअर कमिटीचे प्रदेशाध्यक्ष विनोद सुधाकर पवार, महाराष्ट्र कोअर कमिटीचे खजिनदार सुनील चौधरी यांनी केली आहे.
खेड्यात आजहि काही ठिकाणी इंटरनेटची सुविधा उपलब्ध झालेली नसून जे मोबाइल टावर आहेत पण इंटरनेट चालत नाही. त्याकरिता प्रत्येक गावात मोबाइल टावर सक्रीय करून इंटरनेची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी. कारण आजचे युग इंटरनेटचे युग म्हटले जाते मात्र काही ठिकाणी इंटरनेट उपलब्ध नाही त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी कसा ऑनलाईन अभ्यास करायचा ? त्या संबधित जसे कि, ग्रामपंचायत, पंचायत समिती, नगरपालिका, महापालिका, शिक्षण विभाग जिल्हा परिषद हे काय करीत आहेत? एकीकडे ऑनलाइन शिक्षणाचे धडे देण्याचे स्वप्न पाहायचे आणि दुसरीकडे योग्य त्या सुविधा उपलब्ध न करून देणे हे उदासीनपणाचे लक्षण आहे. याकरिता संबधित ग्रामपंचायत, पंचायत समिती, नगर पालिका, महापालिका, शिक्षण विभाग जिल्हा परिषद यांनी लक्ष देऊन योग्य ती पावले उचलावीत.
तसेच विद्यार्थ्यांना सरकारतर्फे मोफत टॅब व इंटरनेट सुविधा लवकारात लवकर करून देण्यात यावी अशी मागणी पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विजय सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष प्रवीण परमार, महाराष्ट्र कोअर कमिटीचे प्रदेशाध्यक्ष विनोद पवार, महाराष्ट्र कोअर कमिटीचे खजिनदार सुनील चौधरी यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे केली आहे.