मेहरूण : येथील मिल्लत हायस्कुल अँड ज्यू. कॉलेज मेहरूण, जळगाव येथे स्वातंत्र्य दीनानिमित्त मिळत प्रायमरी स्कुल मेहरूणचे मुख्यध्यापक फरीद शाह यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या अनुपस्थितीत या वर्षी ही पहिलीच वेळ आहे.
जेव्हा स्वातंत्र्य दीना निमित्त शाळेत कोणतेच सांस्कृतिक कार्यक्रम झाले नाही. तसेच, प्रसंगी सर्व उपस्थितांनी शासनाच्या दिशानिर्देशानुसार सामाजिक अंतर ठेवत मास्कचा वापर केलेला होता. ध्वजारोहणावेळी मिळत हायस्कुल अँड ज्यू. कॉलेजचे प्राचार्य शेख मुश्ताक अहमद, पर्यवेक्षक ताजोद्दीन शेख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मिल्लत प्रायमरी स्कुल मेहरूण येथील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच इतर शाळातील काही शिक्षक उपस्थित होते.