लहान घर बांधणीतील अडथळे झाले दूर

मुंबई (प्रतिनिधी)- लहान घर बांधायचे तरी आर्किटेक्टकडून प्लॅन मंजूर करवून घेणे त्यासाठीचा लागणारा अवघी आणि पैसा या सगळयांतून आता सर्व सामान्य नागरिकांची मुक्ततपा झााली असून राज्य शासनाच्या नव्या आदेशाने घर बांधणे सोपे केले आहे.


मागील महायुतीच्या  देवेंद्र फडणवीस सरकारने या बाबतचा निर्णय घेतला होता. मात्र अंमलात आणला नव्हता.  परंतु महाविकास आघाडी सरकारने तो अंमलात आणत नागरिकांना मोठा दिला मिळाला आहे. दोन गुंठ्यापर्यंतच्या म्हणजेच 2 हजार स्केअर फुट जागेवर घर बांधायचे असेल तर त्यासाठी आर्किटेक्टकडून प्लॅन सादर करण्याची वा विकसन शुल्क भरण्याची गरज नसेल. राज्य सरकारने ठरवून दिलेल्या बांधकाम नकाशापैकी एखादा आराखडा निश्चित करून जिल्हाधिकार्यांकडे अर्ज केला, तरी बांधकाम करता येणार आहे. पुणे, महाबळेश्वर, कोल्हापूर, इचलकरंजी, सांगली मिरज, नागपूर, चंद्रपूर, बल्लारपूर, नाशिक, अहमदनगर, जळगाव भुसावळ, औरंगाबाद जालना, अमरावती, रत्नागिरी, सिंधदुर्ग, रायगड, मुंबई महानगर प्रदेश अकोला वाशिम प्रादेशिक नगररचना विभागात ही योजना लागू राहील