प्रशांत पाटील यांच्या प्रयत्नांना यश.
उंटावद ता.यावल प्रतिनिधी.
ब-हाणपूर अंकलेश्वर महामार्ग म्हटला की या रस्त्यावरून अवजड वाहनांची वाहतूकीसह लहान-मोठे प्रवासी वाहने व दुचाकी मोठ्या प्रमाणावर रहदारी करीत असतात तर गिरडगाव पासून यावल कडे जातांना गिरडगाव गावाजवळ वळणाच्या रस्त्यावर झाडाझुडपांनी एकच गर्दी केली होती.
त्यामुळे समोरून येणारे वाहन वाहनधारकांना दिसत नव्हते व बरेच अपघात याठिकाणी होत होते या सर्व गोष्टींची दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा सरचिटणीस प्रशांत भीमराव पाटील (गिरडगाव) यांनी ग्रामपंचायतीच्या पत्रासह स्वतः सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात भेट दिली व संबंधित अधिकाऱ्यांना या रस्त्याची तक्रार मांडली तर सार्वजनिक बांधकाम उपविभाग यावल यांनी तात्काळ या तक्रारीकडे लक्ष देत मजुरांच्या साह्याने वळणाच्या रस्त्यावर असलेली कोरडी झाडे व झुडपे काढून रस्ता वाहतुकीस सुरळीत केला आता या रस्त्यावरून समोरून दीड ते दोन किलोमीटरवरून येणारे वाहन एकमेकांना दिसते त्यामुळे अपघात होण्याची शक्यताच नाही म्हणून प्रशांत पाटील व सार्वजनिक बांधकाम विभागाचे वाहनधारकांनसह गावकरी यांनी आभार मानले.