जळगाव – शहरातील प्रतिष्ठित ज्ञान चेतना अपार्टमेंट येथे 74 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यावेळी सेवानिवृत्त भारतीय सैन्य दलातील ज्ञानेश्वर गायकवाड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
तसेच कोरोना काळात अपार्टमेंटमधील डॉक्टर पाटील तसेच डॉक्टर राठोड यांचे कोरोना योद्धा म्हणून मार्गदर्शक नेवे दादा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच भूषण मराठे सर यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. अपार्टमेंटमधील गणपती बसवण्याचा संदर्भात मिटिंग घेऊन कोरोना काळातील नियमाप्रमाणे सोशल डिस्टंसिंग मास वापरणे अशा सर्व बाबींचा विचार करून गणपती साध्या पद्धतीने शाडू मातीचे बसवण्यात यावा असे सर्वानुमते ठरले आहे. ध्वजारोहणासाठी सर्व महिला पुरुष किलबिल परिवार मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.