हम हम स्कूल के बच्चे कोरोना लढेंगेे भी और पढेंगे भी

जामनेर - तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल बेटावद बुद्रुक विद्यालयात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे शाळा बंद पण शिक्षण चालू या ऑनलाइन उपक्रमात विद्यार्थ्यांची आवड लक्षात घेता शाळेचे मुख्याध्यापक श्री आर आर एस ब्राह्मणे सर व सर्व शिक्षक बंधू भगिनींनी ऑनलाईन चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले आहे.


या स्पर्धेचे उद्देश विद्यार्थ्यांना या पुढच्या काळात कुठेतरी अभ्यासाचा लळा लागावा असा होता आणि जवळजवळ 370 विद्यार्थ्यांनी या ऑनलाईन चित्रकला स्पर्धेत भाग नोंदविला होता.


स्पर्धेच्या निकाला दरम्यान शाळेचे मुख्याध्यापक व कला शिक्षकांनी दोन विद्यार्थ्यांची निवड केली लहान गटामध्ये इयत्ता 6 वी ची कुमारी आयुषी महेंद्रसिंग पाटील या विद्यार्थिनीचा प्रथम क्रमांक आला. मोठ्या गटांमध्ये इयत्ता ८ चा प्रदीप नंदू इंगळे या विद्यार्थ्यांचा प्रथम क्रमांक आला. तसेच शिक्षकांचे एकमेव राज्यस्तरीय शिक्षक ध्येय या साप्ताहिकात सुद्धा या दोन विद्यार्थ्यांची चित्रे प्रकाशित झाली. विद्यालयाचे मुख्याध्यापक ब्राह्मणे सर व सर्व शिक्षक बंधू भगिनींनी सुद्धा या विद्यार्थ्यांचे शुभेच्छा देऊन कौतुक केले.