उल्हासनगर I प्रतिनिधी I उल्हास नगर शहरात खान्देश सेनेच्यावतीने, कोरोना व्हायरससारख्या खतरनाक महामारी रोखण्यासाठी अनेक उपक्रम राबविले गेले होते. त्यात, सुरुवातीपासूनच मोफत मास्क वाटप, sanitizer वाटप करण्यात आले.
तसेच नागरिकांना जनजागृती करतांना... स्वच्छतेचे, सोशल डिस्टन्सिंगचे महत्त्व पटवून देण्यात आले होते, नागरिक खरोखरच आपला जीव धोक्यात घालून ह्या संदर्भात जे सेवाभावी कार्य करीत आहे.
त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी Corona योद्धा सन्मान पत्र देवून गौरविण्यात आले, आदरणीय खान्देश सेना प्रमुख सुहास दादा बोंडे साहेब यांनी आपल्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकारी यांना वेळोवेळी अमूल्य मार्गदर्शन केले.
सर्वसामान्य नागरिकांना मदतीचा हात दिला, ह्याची फलश्रुती आज होतांना दिसत आहे. उल्हास नगर शहरात महानगरपालिका मधील, आयुक्त, महापौर, नगरसेवक, महानगरपालिका मधील अधिकारी, सर्व कर्मचारी, सर्व शासकीय निम शासकीय कर्मचारी, सबंधित यंत्रणा, सर्व पोलिस अधिकारी, पोलीस कर्मचारी बांधव, शहरातील सर्व डॉक्टर्स, सर्व संबधित स्टाफ, कर्मचारी, मेडिकल स्टोअर, सामाजिक संस्था, कार्यकर्ते पदाधिकारी, सर्व पक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते, धार्मिक संस्था, सर्व शिक्षक बंधू भगिनी, सर्व पत्रकार बांधव सर्व कामगार बांधव, व्यापारी बांधव, सर्व संबधित ज्ञात, अज्ञात कर्मचारी, बंधू आणि भगिनी, उल्हास नगर शहरातील नागरिकांनी COVID-19 च्या उच्चाटन साठी जे मनापासून प्रयत्न केले त्याचसाठी उल्हासनगर शहराने COVID-19 रुग्ण recovery रेट मध्ये 93.5 च्या recovery स्तराने, दिल्ली ला मागे टाकत... राष्ट्रीय चार्ट मध्ये आपले स्थान सर्वात वर नेले आहे,, याचा अभिमान आहे, की उल्हास नगर वासी अश्या संकट प्रसंगी सुद्धा COVID-19 ह्या गंभीर आजारात सुरक्षेचे नियम पाळून मोठ्या धिराने तोंड देत आहे.