जळगाव - गणेशोत्सव ही संकल्पना लोकमान्य टिळकांनी गावोगाव मांडून सर्व भारतीय समुदायला एकोपा जोपासणारा संदेश दिला होता. तसे पाहिले तर गणेशोत्सव हा फक्त पुरुष वर्गासाठी खुप उत्साहाचा व आनदांचा असतो. दहा दिवस जगभर गणपती बाप्पा चा जल्लोष व रोषणाई असते .
प्रमुख्याने पुणे, मुंबई व इतर ठिकाणी प्रसन्न वातावरण असते. असाच एक आगळा वेगळा गणेश मंडळाची दखल जळ्गावच्या ऑल इंडिया पोलीस सेवा संघटना भारत च्या पदाधिकारी यानी घेवुन या दीपश्री महिला बचत गटाच्या भगिनींचा सन्मान केला.विशेष असे की या भगिनी सलग गेल्या तीन वर्षा पासून पुरुषाची मदद न घेताच एकट्या महिला गटाच्या सहाय्याने गणपती बुकिंग पासुन मुर्ति स्थापना व भंडारा आणि विसर्जन हे महिला बचत गटाच्या साहाय्याने करित आहे.
त्यांचे कौतुकास्पद कार्य बघुन सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देवून ऑल इंडिया पोलीस संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री प्रकाश डोंगळे यांच्या मार्गदर्शनाने जिल्हाअध्यक्ष श्री भावेश पी.ठाकुर, महिला जिल्हाध्यक्षा श्रीमती शितल संजय जडे, शहरअध्यक्ष्य श्री तिलोत्तमदास (अतुल)बोंडे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला,
या प्रसंगी प्रोफेसर रफिक शेख़, कुणाल जडे, श्री महेश पाटील, श्री विनय नेहते, सदस्य ओमप्रकाश राठोड आणि हितेश भावसार व दिपश्री महिला बचत गटाचे अध्यक्षा- दिपाली पाटील
उपाध्यक्ष- कविता नेहेते, सचिव- सुलभा पाटील, सदस्य- पूनम पाटील , सुलोचना नारखेडे, शोभा पाटील, नूतन पाटील ,हेमलता इंगळे, उषा सपकाळे, कोकिळा पाटील हे उपस्थित होते.