जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यातील कोरोना चाचण्यांच्या संख्येने आज एक लाखाचा टप्पा पार केला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आली आहे. जळगाव जिल्ह्यात कोरोनाच्या आपत्तीच्या काळात प्रारंभी तपासणीची सुविधा नव्हती. पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नांनी जळगावात प्रयोगशाळा सुरू झाल्याने चाचण्या वेगाने सुरू झाल्या. तरीही चाचण्या अपूर्ण वाटू लागल्यानंतर अँटीजेन टेस्टच्या माध्यमातून जलद गतीने चाचण्या होऊ लागल्या. या पार्श्वभूमिवर आज जिल्ह्यात एकूण चाचण्यांची संख्या १०१०४६ इतकी झाली आहे. यातील २२३१८ इतके पॉझिटीव्ह आढळून आले आहेत.
अलीकडच्या काळात चाचण्यांची संख्या वाढत असल्याने पॉझिटीव्ह रूग्णसंख्या देखील साहजीकच वाढीस लागली आहे. तथापि, सुदैवाची बाब म्हणजे बरे होणार्या रूग्णांची संख्या देखील वाढत आहे.