जळगाव - बोदवड येथील न्यूज स्टार जिल्हा जळगाव (मीडिया) चे जिल्हा रिपोर्टर, सामाजिक कार्यकर्ते मा. जितेंद्र रामकृष्ण गायकवाड यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या भुसावळ तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. हे मु. पो. साळशिंगी ता. बोदवड, जिल्हा- जळगाव. मो.न.- 8999138853 राहणारे आहेत.
हे सामाजिक क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत असलेले श्री. गायकवाड सर पत्रकारितेत आमूलाग्र बदल घडवू पहात आहेत. श्री. गायकवाड सर पत्रकारांच्या सेवेसाठी आपली संगटना व आम्ही सर्वजण आपल्या सोबत आहोत. आपण संघटन शैलीची शक्ती सादर करून समाजसेवेसाठी तत्पर राहावे हीच सदिच्छा. सदर नियुक्ती पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री. विजयजी सूर्यवंशी साहेब यांच्या आदेशान्वये कोअर कमिटीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री .विनोद सुधाकर पवार यांनी जळगाव तालुका अध्यक्ष श्री. योगेश प्रकाश भामरे व जळगाव शहर अध्यक्ष श्री. निलेश भामरे यांच्या अनुमोदनाने करण्यात आली आहे. त्याबद्दल आपले अभिनंदन...