महापालिकेचे ३५ वर्षात आपण केलेले खड्डे आम्हीच भरतोय
जळगाव -  जळगाव शहर महानगरपालिकेत ३५ वर्षांनतर ऑक्टोबर २०१८ ला भारतीय जनता पार्टीला जनतेने महानगरपालिकेत सत्ता दिली. ऑक्टोबर २०१८ ते आज ऑगस्ट २०२० पर्यंत आज रोजी २० महिनेच महापलिकेत सत्तेत येऊन झाले. त्या मध्ये २०१९ च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीचे आचार संहितेचे ४ महिने गेले.  स्थिर होत नाही तोपर्यंत कोरोना महामारी जगभरात आली, तशीच जळगावात पण आली त्यात सहा महिने गेले. अजून काही जातील म्हणजेच भारतीय जनता पक्षाला म.न.पा. मध्ये सत्तेत येऊन कामकाजासाठी ३०० दिवसच मिळाले. तरी पण जो कालावधी मिळाला त्यात सर्वात मोठे ऐतिहासिक निर्णय म्हणजेच महापालिकेवर असलेले हुडकोचे कर्ज माफ करून राज्य शासनाने एकर कमी फेड केली. जे.डी.सी.सी. बँकेचे कर्ज संपूर्ण भरण्यात आले. व म.न.पा. कर्ज करण्यात आली. हा मोठा खड्डा आम्ही भारला. अमृत योजना जळगाव शहरात आणली भुयारी गटार मंजुर करण्यात आली. व हि कामे प्रगतीवर आहे.

 

तरी शिवसेनेला आंदोलन करण्याचा नैतिक अधिकार कितपत आहे. याचे आत्मपरीक्षण करावे. तसेच जळगाव शहराचा विकास करण्याचा आमचा संकल्प आहे. व ते आम्ही पूर्ण करू शिवसेनेने शासनाकडे पाठपुरावा करून आंदोलन करण्यापेक्षा जळगाव शहराच्या विकासासाठी भरघोस निधी आणल्याचे आवाहान महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांनी केले आहे.