जळगाव - के.सी.ई.सोसायटी संचलित आय.एम.आर. मध्ये अनेक वर्षापासुन स्वातंत्र दिनाच्या पूर्वसंध्येला देशभक्तीपर गीतगायन स्पर्धा घेतली गेली. त्याच शृंखलेत या वर्षी लाॅकडाउनच्या काळातही खंड पडू ना देता.. आजी माजी विद्यार्थीसाठी आॅनलाईन देशभक्तीपर स्पर्धा संपन्न झाल्यात. आय एम आर च्या माजी विद्यार्थ्यांच्या देशभरातून एन्ट्री या स्पर्धेसाठी प्राप्त झाल्यात.या स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे
आय एम आर चे आजी विद्यार्थी :
१.साक्षी वाणी
२.आकाश सोनावणे
३.संजना इंगळे
आणि आय एम आर चे माजी विद्यार्थी:
१.ओमप्रकाश जिवानी
2.प्राची भाटिया (बडोदा)
या सर्वांचे आय एम आर च्या डायरेक्टर प्रा डॉ शिल्पा बेंडाळे यांनी अभिनंदन केले तसेच प्रा डॉ शुभदा कुलकर्णी, प्रा डॉ शमा सराफ, साधना थत्ते आणि भाग्यश्री खडके यांनी या टेक्नोसॅव्ही स्पर्धेसाठी मार्गदर्शन केले.