महात्मा फुले शिक्षण संस्थेचे कार्य गौरवास्पद : ए. पी. आय परदेशी

पहूर , ता जामनेर (प्रतिनिधी) :-  कोरोना विषाणू संक्रमणाच्या काळात महात्मा फुले शिक्षण संस्था विद्यार्थी आणि पालकांच्या सोबत असल्याचा अभिमान वाटतो . ऑनलाइन पद्धतीने शिक्षक विद्यार्थ्यांचा अभ्यास घेत असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित जोपासले जात आहे .तसेच शासनाच्या आदेशानुसार शालेय पोषण आहार योजनेचा लाभ दिला जातो आहे , शाळा आणि समाज आज या एकाच नाण्याच्या दोन बाजू असून समाज घडविण्याचे कार्य शाळेतून होत असल्याचे गौरवोद्गार पहूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राकेशसिंह  परदेशी यांनी काढले . पहूर येथील महात्मा फुले शिक्षण संस्था संचलित डॉ . प्राथमिक विद्यालय आणि सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाच्या शालेय पोषण आहार योजनेच्या धान्य वाटप कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते .


कोरोना विषाणू संक्रमणाच्या या पार्श्वभूमीवर राज्यात सर्वत्र शाळा बंद आहेत .मात्र विद्यार्थ्यांना  शालेय पोषण आहार योजनेच्या माध्यमातून शाळेला प्राप्त झालेला तांदूळ , हरभरा , मूगडाळ आदी धान्य  वाटप करण्यात येत आहे . पहूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेशसिंह परदेशी यांच्या शुभहस्ते धान्य वाटप योजनेचा शुभारंभ करण्यात आला . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा फुले शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाबुराव आण्णा घोंगडे होते.  महात्मा फुले शिक्षण संस्था आणि ग्रामपंचायत पहूर कसबे यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोना काळात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या कोरोना योद्ध्यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले . प्रारंभी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती व्ही .व्ही .घोंगडे यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेशसिंह परदेशी , बाबुराव आण्णा घोंगडे , शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष दिपक जाधव , तुकाराम जाधव, संतोष बनकर , शरद इंगळे  यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले .  सूत्रसंचालन शंकर भामेरे यांनी केले . श्रीमती के .ए. बनकर यांनी आभार मानले .


यावेळी बी .एन . जाधव , एच . बी .राऊत , सी . एच . सागर , ए. ए . पाटील ,   पी . आर . वानखेडे ,  आर . जे चौधरी , आर . डी .सोनवणे , ए. एस . बावस्कर , डी.एस पाटील , वाय. एन . तडवी , ए. एम क्षीरसागर , ए. आर . देशमुख ,  एम . एस . खोडपे ,  के.एन .पाटील आदींची उपस्थिती होती . यशस्वीतेसाठी प्रकाश जोशी , सुनिल पवार , संजय बनसोडे यांनी सहकार्य केले . याप्रसंगी सोशल डिस्टंसिंग चे पालन करण्यात आले.