बोदवड/प्रतिनिधी:शाळा महाविद्यालयाचे नवीन सत्र आणि प्रवेश ऑनलाईन सुरू झाल्याने त्यासाठी हव्या असलेल्या विविध कागदपत्राची पूर्तता करण्यासाठी ,शैक्षणिक दाखल्यांसाठी तहसील येथील सेतू केंद्रावर विद्यार्थी आणि पालकांची गर्दी तालुक्यात कोरोना रुग्णचा आकडा 300च्या पार तर तहसील कार्यालयात 2 रुग्ण +ve आल्या नंतरही प्रशासनाला जाग येत नसून ,शैक्षणिक दाखले मिळविण्यासाठी तहसील कार्यालयातच सोआशियल डिस्टनसिंग चा फज्जा उडाल्याचे चित्र आहे.सेतू केंद्रावर अर्जाची संख्या पाहता अर्ज जमा करण्यासाठी आणि दाखला मिळण्यासाठी एकच खिडकी असल्याने विद्यार्थ्या सहित पालकांना वेळेत दाखले मिळण्यासाठी तासनतास उभे राहून दोन तीन दिवस हेलपाटे मारावे लागत आहेत.
कोरोना सारख्या संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव असतांना निव्वळ सरकारी यंत्रणेच्या व सेतू कारभाराच्या अनास्थेमुळे विद्यार्थ्यांना गर्दी करावी लागत आहे. सर्वसामान्याच्या सोयीसाठी प्रत्येक जिल्ह्य़ाच्या ठिकाणी तहसील कार्यालयात सेतू नावाची संस्था निर्माण करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातून एनजीओना कंत्राट देण्यात येते. त्यामुळे सेतू मधील कर्मचारीही कंत्राटी असतात. सेतू कार्यालयातील काही अधिकारीही विद्यार्थी -पालकांचे काम फारसे गांभीर्याने घेत नाहीत. उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी दोन दिवसाचा कालावधी पुरेसा असतो
मात्र, दाखला मिळण्यासाठी त्याला 15 दिवसांचा कालवधी देण्यात येतो.तसेच दाखल्या साठी 35 रुपये शुल्क असताना कागपत्र स्कॅनिंग च्या नावाखाली 50 रुपये घेऊन विद्यार्थीची लूट होत असल्याचं चित्र आहे.या ठिकाणी नागरिकांसाठी बसण्याची व्यवस्था नाही, तसेच एकच खिडकीतून सर्व व्यवहार होत असून कर्मचारी संख्या ही अत्यल्प आहे. अशा अवस्थेत प्रमाणपत्र घेण्यासाठी येणाऱ्या लोकांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.सेतू केंद्रावर अर्ज स्वीकारण्यासाठी व मिळयांसाठी खिडकी संख्या वाढवावी, अशी मागणी विदयार्थी आणि पालकांडून करण्यात येत आहे.