गणेश विसर्जनासाठी शेंदुर्णीत ८ ठिकाणी मुर्त्यांचे संकलन होणार
शेंदुर्णी ता.जामनेर - सध्या करोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता शासनाने केलेल्या आवाहनानुसार सार्वजनिक व घरघुती स्वरुपात विराजमान असलेल्या गणपती बाप्पा चे अनंत चतुर्थीला म्हणजे आज विसर्जन होणार आहे मात्र मिरवणुकीला बंदी घालण्यात आली असल्याने भाविकांनी याची खबरदारी म्हणुन शहरातील ८ ठिकाणी या घरघुती व सार्वजनिक मुर्त्यांचे संकलन करावे असे आवाहन शेंदुर्णी नगरपंचायत चे मुख्याधिकारी साजिद पिंजारी व पहुर पोलिस स्टेशनचे सपोनि. राकेशसिंग परदेशी यांनी केले आहे.

 

शहरातील नगरपंचायत कार्यालय, श्री.त्रिविक्रम मंदिर, दत्त मंदिर चौक,पारस चौक, गांधी चौक,डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक,धनगर गल्ली व वाचनालय चौकात या ठिकाणी गणपती बाप्पा यांच्या मुर्ती संकलन करण्यात येणार असुन या ठिकाणी नगरपंचायत चे कर्मचारी उपस्थित राहणार आहे .या सर्व मुर्ती विधीवत पुरोहित यांच्या कडुन पुजा करण्यात येणार असुन सजविलेल्या ट्रँक्टर मधुन त्या मुर्ती नेण्यात येतील.तेथे विधीवत विसर्जन करण्यात येणार आहे.

 

तरी शासनाच्या आदेशानुसार कुणीही मिरवणुक काढु नये.सर्व नगरसेवक यांनी आपल्या वार्डात गणपती मंडळाच्या पदाधिकारी यांना यासाठी प्रोत्साहित करावे व अधिकाधिक मुर्तीचे संकलन करण्यासाठी सहकार्य करावे.

 

कुणीही सार्वजनिक मिरवणुक काढु नये जर कुणी ,मंडळाने कायद्याचे उल्लंघन केल्यास त्यांचेवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त मंडळांनी,घरघुती स्वरुपातील भाविकांनी मुर्ती संकलन केंद्रात मुर्तींचे संकलन करण्याचे आवाहन शेंदुर्णी नगरपंचायत चे मुख्याधिकारी साजिद पिंजारी व पहुर पोलीस स्टेशनचे सपोनि. राकेशसिंग परदेशी यांनी पत्रकाद्वारे केले आहे.