जळगावातील प्रजापत नगर , पवन नगर रस्त्याअभावी नागरीक त्रस्त

जळगाव – जळगाव शहरात सध्या मोठ्या प्रमाणात खड्डे तसेच चिखलाची समस्या नागरिकांना भेडसावत आहे. महापालिकेच्या वतीने तात्पुर्ताची डागडुजी करण्यात येत आहे, मात्र तरी देखील परिस्थिती पावसाच्या जास्त प्रमाणामुळे जैसे थे आहे. प्रजापत नगर , पवन नगर येथे मोठ्या प्रमाणात अमृत योजनेचे खड्डे पडले असताना नागरिकांना घराबाहेर जाणे मुश्किली चे झाले आहे.


” मतमागायला येणारा प्रत्येक उमेदवार हा विकास कामाचे आश्वासन देऊन नेहमी प्रमाणे वेळ मारून नेतो आम्ही मात्र अपॆक्षा लावून असतो , स्थानिक स्वराज्य संस्थेत मतदानाच्या वेळेत आम्ही ज्यांच्या भरोशावर मतदान केले त्यांनीच आमच्या कडे पाठ फिरवली असल्याचा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.


प्रजापत नगरात राहणाऱ्या काही नागरिकांनाचा मटकी ,मूर्ती,घडविण्याचा व्यवसाय असून उपजीविका भागविण्या करीता कोरोनाच्या आपत्ती काळात मट्के विक्री करण्यासाठी बाहेर पडावे लागत आहे, मात्र घराबाहेर बाहेर निघाल्यास चिखल , खड्डे झाले असल्याने वाहने घसरून पडत आहे,


यामुळे एका कुंभार करणाऱ्या नागरिकाचा अपघात हाताला दुखापत झाली आहे. महापालिका प्रशासन , सत्ताधाऱ्यांनी आमच्या वेदना समजून घ्याव्यात व तात्काळ रस्ता दुरुस्तीचे काम सुरु करण्यात यावे अशी मागणी प्रजापती नगर व पवन नगर येथील स्थानिक नागरिकांनी केली आहे.


गेल्या पन्नास वर्षा पासून रस्त्याचे कामच झालेले नाही, आता पर्यंत आम्हाला फक्त आश्वासने दिली गेली आमच्या संयमाचा अंत पाहू नये असा इशारा देखील नागरिकांनी दिला आहे.


नगरसेवक म्हणतात … 


येथील परिसराचे नगरसेवक नवनाथ दारकुंडे , किशोर बाविस्कर यांच्याशी महा बातम्यांच्या प्रतिनिधीशी बातचीत केली असता त्यांनी अमृत योजनेचे काम सुरु असल्याचे सागितले आहे, अमृत योजनेचे काम उशिराने होते म्हणून आम्हाला नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत असून नागरिकांनी आम्हाला सहकार्य करावे असे आवाहन केले आहे, लवकरच रस्त्याचे काम हाती घेण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.