महानगर पालिकेने रस्त्याच्या कामाची सखोल चौकशी करून कारवाई करावी - अनिल अडकमोल.

जळगाव - गेल्या डिसेंबर महिन्यात शहरातील विविध भागात १ कोटी‌ ६५ लाख  रुपये खर्च करून रस्त्याच्या कामे केली असता त्या सर्व कामांची काॅलेडी कंट्रोल कडून सखोल करण्यात यावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आठवले गटाचे महानगर अध्यक्ष अनिलअडकमोल यांनी केले असून कामात अनियमितता आढळून आल्यास संबंधित ठेकेदार वअभियंता यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येऊन संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्यात यावे तसेच अभियंता यांच्यावर कारवाई कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी


एकाच कामासाठी दोन वेळा निविदा प्रक्रिया होत असेल तर हि शहरातील लोकांची दिशाभूल केली जात असल्याचे अडकमोल यांनी केले आहे देशात राज्यात जिल्ह्यात तसेच शहरात वाढत्या कोरोना प्रादुर्भाव होत असताना अशा महामारीत शहरातील विविध भागात रस्त्याच्या बोगस कामे करून बिले मंजूर करून घेतले असेल तर ही योग्य बाब नाही त्यामुळे शहरातील झालेल्या सर्व रस्त्यांच्य कामाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी तसेच ज्या ज्या भागात कामे झालेली आहे


अशा ठिकाणी जाऊन काम झाले कीवा नाही याबाबतीत रहिवासी यांच्याशी चर्चा करून माहिती घेतली जाईल संबंधित भागात विकास कामे न आढळून आल्यास  रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्यावतीने महानगर पालिका येथे आंदोलन छेडले जाईल असा इशारा यावेळी अनिल‌‌‌ अडकमोल यांनी दिलाआहे .