जळगावचे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय केले ‘सॅनिटाईझ’

जळगाव – येथील उपप्रादेशिक परिवहन संपूर्ण कार्यालयात जिल्हा मोटर ड्रायव्हींग स्कूल ओनर्स असोसिएशन व सुधानंदा चॅरिटेबल ट्रस्ट, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने सॅनिटाईझ करण्यात आले.


याबाबत असे, औद्योगिक वसाहत जळगाव येथील जगप्रसिध्द डॉ. सुमोज लॅब प्रा. लिमिटेड ने बनवलेलं आंतरराष्ट्रीय दर्जाचे ‘कोरोनाश’ सॅनिटाईझर चा वापर करून उप प्रादेशिक परिवहन कार्यालय सॅनिटाईझ करण्यात आले. आधुनिक पध्दतीचा स्प्रे पंपाच्या साहाय्याने अधिकारी वर्गाचे कॅबिन, टेबल, खुर्ची, खिडक्या दरवाजे यांच्यावर स्प्रे केला गेला. कोरोनाश सॅनिटाइझर हे टेबल खुर्चीच्या पृष्ठभागावर ९० दिवसापर्यंत किटाणूचा नाश करते.


याबाबत भारतातल्या आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या लॅब कडून कोरोनाश प्रमाणित झाले आहे. याप्रसंगी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी शाम लोही, सुबोध चौधरी, सुनील चौधरी, सौंदर्या चौधरी, सुमोल चौधरी, संजना चौधरी, जळगाव जिल्हा मोटर ड्रायव्हींग ऑनर्स असोसिएशनचे अध्यक्ष ऍड जमील देशपांडे, उपाध्यक्ष रामभाऊ शिरसाट, सचिव किरण अडकमोल, सहसचिव नथ्थू अहिरे, रईस मिर्झा, सुनील ठाकूर, सुनील पाटील, रमिज देशमुख, इकबाल मिर्झा आदी उपस्थित होते.